Business Idea : आता नोकरीचे टेन्शन मिटले ! फक्त 10,000 रुपयांमध्ये सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवा 50 हजार…

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea : आजकाल तरुणवर्ग खूप कमी पगारांवर नोकरी करत आहेत. अशा वेळी नोकरीतून त्यांना हवे तेवढे पैसे मिळत नसल्याने त्यांचे आथिर्क बजेट कोलमडून जाते.

अशा वेळी तुम्ही आता नोकरी न करता 10,000 रुपयांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला 50हजार रुपये सहज कमवू शकता. हा व्यवसाय करून तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.

आज आम्ही तुमच्यासाठी कमी गुंतवणुकीत केटरिंग व्यवसाय घेऊन आलो आहे. तुम्ही फक्त 10,000 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. एवढ्या कमी खर्चात नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे खूप सोपे होईल.

आजच्या काळात अनेक तरुण नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, यासाठी सर्वात मोठे आव्हान हे फंडाचे आहे. तुमच्याकडे खानपान व्यवसायासाठी किमान 10,000 रुपये असले पाहिजेत. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

सुरुवात कशी करावी?

तुम्ही केटरिंग व्यवसाय कधीही आणि कुठेही सुरू करू शकता. त्यासाठी फक्त रेशन आणि पॅकेजिंगवरच खर्च करावा लागणार आहे. यासाठी तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ असले पाहिजे. ते सुरू करण्यासाठी, तुम्हाला भांडी, गॅस सिलिंडर इ. तसेच मजूरही लागणार आहेत.

हा असा व्यवसाय आहे ज्यासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता नाही. तसेच, हा असा व्यवसाय आहे जो कायम चालू राहू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही यातून दरमहा 25,000 ते 50,000 रुपये कमवू शकता. नंतर, व्यवसाय वाढल्यास, तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

बाजार शोधा

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालविण्यासाठी बाजारपेठेचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. केटरिंग व्यवसायही याला अपवाद नाही. जर तुम्हाला या व्यवसायात जायचे असेल, तर तुमच्या सेवेबद्दल ऑनलाइन आणि मित्रांमार्फत प्रसार करा. हळुहळू तुमच्याकडे ऑर्डर येऊ लागतील. आज लोक छोट्या पार्ट्यांमध्येही चांगला केटरर शोधतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe