Automation Jobs : जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस अनेक नवीन बदल घडत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अजूनही नोकर कपातीचे सावट कायम आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेकांना उपयुक्त ठरत आहे. तर अनेकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोक्याची घंटा आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या जायला लागल्या आहेत. जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. तसेच भारतातील कंपन्यांनी देखील आता नोकरकपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये अनेक तरुण आणि तरुणी बेरोजगार होणार आहेत.
सध्या AI हे नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हळूहळू नोकऱ्या जाऊ लागल्या आहेत. बँक टेलर, डेटा एन्ट्री क्लार्क, कॅशियर यांसारख्या नोकऱ्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
जर जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब केल्यास येत्या ५ वर्षांमध्ये अनेक नोकऱ्या जातील आणि नवीन नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणार नाहीत. अहवालात असे म्हटले आहे की 803 कंपन्या आहेत ज्या एआय, बिग डेटा आणि क्लाउड कॉम्प्युटिंग सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची योजना आखत आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या एका अहवालात हा खुलासा केला आहे. अहवालानुसार, बँकिंग क्षेत्रावरील AI तंत्रज्ञानाचा नोकऱ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. ऑनलाइन बँकिंगचे जग अनेक भौतिक बँक शाखांवर परिणाम करू शकते.
ऑनलाईन आर्थिक व्यवहार आणि ऑनलाईन बँकिंग पद्धतीमुळे बँकाही बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बँक टेलर आणि त्याच्याशी संबंधित लिपिक नोकऱ्यांनाही धोका आहे. अहवालानुसार, अशा नोकऱ्यांमध्ये 40 टक्क्यांपर्यंत कपातही दिसून येते.
येत्या काळात जास्त पगारदार असणाऱ्या डेटा लिपिकांना मोठा फटका बसू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे डेटा लिपिकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना AI धोक्याचे ठरू शकते तसेच काहींना ते फायद्याचे देखील ठरू शकते.