World Password Day 2023: या सोशल मीडियाच्या काळात आज प्रत्येक गोष्टीसाठी आपण सर्वजण पासवर्ड वापरत असतो.
आज अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीनसाठी वेगळे तर apps साठी वेगळे पासवर्ड सहज पाहायला मिळतात. म्हणूनच आज आम्ही 04 मे World Password Day 2023 च्या दिवशी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या लाभ घेऊन तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी स्ट्रॉंग पासवर्ड बनवू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हॅकर्स सोपे आणि कमकुवत पासवर्ड 1 मिनिटापेक्षा कमी वेळात सहजपणे क्रॅक करतात. आज आम्ही तुम्हाला यापासून दूर राहण्याचे काही उपाय सांगणार आहोत. काही पासवर्ड बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
1. एकच पासवर्ड अनेक वेळा वापरू नका
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी नेहमी वेगवेगळे पासवर्ड ठेवा. जेनेरिक पासवर्ड सेट करणे लक्षात ठेवणे सोपे असले तरी, यामुळे तुमची सर्व खाती फक्त 1 पासवर्डने लीक होऊ शकतात. हॅकर्स एका सेकंदापेक्षा कमी वेळात सोपे किंवा कमकुवत पासवर्ड क्रॅक करतात. त्यामुळे जर तुमच्याकडे अनेक सोशल प्लॅटफॉर्म असतील तर प्रत्येकाचा पासवर्ड सारखाच ठेवणे टाळा.
2. Random शब्द वापरा
शब्द, संख्या आणि चिन्हे यांचे मिश्रण असलेल्या पासवर्डचा अंदाज लावणे अधिक कठीण असते आणि त्यामुळे हॅक होण्याची शक्यता कमी असते. म्हणून, शब्द, संख्या आणि चिन्हे यांचे मिश्रण असलेला पासवर्ड वापरण्याचा प्रयत्न करा. असे मजबूत पासवर्ड क्रॅक करणे सोपे नाही.
3. लांब पासवर्ड ठेवा
लहान पासवर्डचा अंदाज लावणे सोपे आहे म्हणून पासवर्ड तयार करताना लक्षात ठेवा की तो किमान 8-12 शब्दांचा असावा कारण लांब शब्द पासवर्ड हॅक करणे खूप कठीण आहे.
4. 2FA/MFA वैशिष्ट्य वापरा
पासवर्ड लांब ठेवण्यासोबतच तो अधिक सुरक्षित ठेवणेही खूप महत्त्वाचे आहे. बहुतेक प्लॅटफॉर्म ईमेल आणि फोन नंबर इत्यादीद्वारे OTP सारखे अतिरिक्त सुरक्षा पर्याय प्रदान करतात. पासवर्ड चोरी किंवा हॅक टाळण्यासाठी तुमच्या फोनमध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. हॅकरला तुमचा पासवर्ड माहीत असला तरीही, जोपर्यंत त्याला OTP मिळत नाही तोपर्यंत तो तुमच्या खात्यात प्रवेश करू शकत नाही.
5. पासवर्ड कुठेही लिहू नका
कागदावर पासवर्ड लिहू नका. तसेच, त्यांना WhatsApp, Facebook इत्यादी सोशल मीडियावर सेंड करू नका. जर तुम्हाला पासवर्ड कुठेतरी सेव्ह करायचा असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये पासवर्ड मॅनेजर सेव्ह करून ठेवू शकता. अनेकवेळा आपण फोनमध्ये आपला पासवर्ड नोंदवून ठेवतो, अशा परिस्थितीत कोणीही पासवर्ड पाहू शकतो आणि त्याचा गैरवापर करू शकतो.
चुकूनही असे पासवर्ड बनवू नका
123456,12345678,bigbasket,123456789,pass@123,abcd1234,googledummy, India@123, p@ssw0rd, 987654321 हे काही पासवर्ड आहेत जे 1 सेकंदापेक्षा कमी वेळात हॅक केले जाऊ शकतात.
हे पण वाचा :- Maruti Suzuki च्या ‘या’ दमदार कारने Tata Nexon ला दिला धक्का ! अप्रतिम फीचर्ससह किंमत आहे फक्त ..