Infinix Zero Ultra 5G : सोडू नका अशी संधी! 200MP कॅमेरा आणि अवघ्या 12 मिनिटांत चार्ज होणारा फोन 5 हजारांमध्ये खरेदी करता येणार, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Infinix Zero Ultra 5G : जर तुम्ही स्वस्तात नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल आणि जर तुमचे बजेट कमी असेल तर आता काळजी करू नका. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता Infinix Zero Ultra 5G हा फोन तुम्ही फक्त 5 हजारांमध्ये खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीचा हा फोन 200MP कॅमेरा आणि अवघ्या 12 मिनिटांत चार्ज पूर्ण चार्ज होतो. काय आहे संपूर्ण ऑफर जाणून घ्या.

स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी

Infinix Zero Ultra 5G हा स्मार्टफोन सध्या Flipkart वर 49,999 रुपयांच्या मूळ किमतीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. परंतु हा फोन तुम्ही 32,999 रु. मध्ये 17,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह सहज खरेदी करू शकता. परंतु सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला त्याची किंमत आणखी कमी करता येईल.

सध्या फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर एकूण 26,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन आणखी 1,750 रु. पर्यंत सवलत मिळेल. तसेच जर तुम्ही दोन्ही ऑफरचा पुरेपूर लाभ घेऊ शकला तर या फोनची किंमत फक्त 4,999 रुपये असणार आहे, म्हणजेच हा फोन तुम्हाला मूळ किमतीपेक्षा कमी 45,000 रुपयांपर्यंत खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीच्या या शानदार 5G फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून जो 120 Hz रिफ्रेश रेट, 360 Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 900 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो . यात MediaTek Dimensity 920 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 12 वर आधारित XOS 12 वर करेल.

अवघ्या 12 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज

कंपनीकडून यात फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये तीन मागील कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात 200-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश असणार आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो 180W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरीसह येतो. हा फोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अवघे12 मिनिटे लागतात असा दावा कंपनीने केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe