MG Comet EV : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण नुकतेच MG Motors कडून भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार Comet EV लाँच करण्यात आली आहे.
असे असतानाच कंपनीने आता भारतातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीचे प्रकार आणि किमती जाहीर केल्या आहे. या कारमध्ये कंपनी एकूण 230 किमीची शानदार रेंज देत आहे. येत्या 15 मे पासून या कारच्या डिलिव्हरीला सुरुवात केली जाणार आहे.
किती आहे किंमत?
MG Comet EV ही पेस, प्ले आणि प्लश अशा तीन ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे. याच्या किमती अनुक्रमे रु. 7.78 लाख, रु. 9.28 लाख आणि रु. 9.98 लाख रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. कंपनीची ही कार टाटाच्या Tiago EV ला टक्कर देते. जर Tiago EV च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 8.69 लाख रुपये इतकी आहे. तसेच त्याचे टॉप-एंड व्हेरिएंट रुपये 11.99 लाख एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असणार आहे.
जाणून घ्या पॉवरट्रेन
कंपनीकडून या कारमध्ये 17.3 kW ची मोटर देण्यात आली आहे. जी चार्ज करण्यासाठी 7 तासांचा वेळ लागतो. कंपनीची ही कार तुम्हाला एकूण 230 किमीची कूल रेंज देईल.
मिळणार शानदार फीचर्स
या नवीन एमजी इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला शानदार फीचर्स पाहायला मिळतील. यात तुम्हाला कनेक्टेड एलईडी डीआरएल, ऍपल आयपॉड, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ड्युअल-कलर इंटीरियर, 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्पीकर, ऍपल कार प्ले, यांसारखी शानदार फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
या शिवाय कंपनीकडून या कारमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. यात एअरबॅग्ज, टीपीएमएस, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, थ्री पॉइंट सीटबेल्ट यांसारखी सेफ्टी फीचर्स दिली गेली आहेत.