Muslim Population : जगात सर्व धर्माचे लोक राहतात. प्रत्येक देशाचा विचार केला तर त्या देशात सर्व धर्माचे लोक तुम्हाला आढळतील. मात्र एक असाही देश आहे जिथे तुम्हाला सर्व धर्माचे लोक भेटतील मात्र तिथे एकही मुस्लिम व्यक्ती नाही.
होय, हे खरे आहे. संपूर्ण जगात ख्रिश्चन धर्मानंतर येणारा धर्म म्हणजे इस्लाम. इस्लामच्या अनुयायांना ‘मुस्लिम’ म्हणतात. जगात सर्वाधिक मुस्लिम लोक मध्य पूर्व आशियामध्ये आहेत. तसेच मुस्लिम बहुल देशांमध्ये यूएई, सौदी अरेबिया, ओमान, अफगाणिस्तान, इराण, इराक असे अनेक देश आहेत. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक आहेत.
दरम्यान, तुम्ही जगातील कोणत्याही देशात जा, तुम्हाला सर्वत्र मुस्लिम समाजाचे लोक आढळतील. आणि हे तुम्ही स्वतःहा अनुभवलेही असेल. मात्र या सर्व गोष्टींवर अपवाद ठरणारा एक देश आहे, जिथे एकही मुस्लिम नाही. आज आम्ही तुम्हाला याच देशाबद्दल सांगणार आहे. सविस्तर जाणून घ्या.
एकही मुस्लिम नसलेला देश
जगातील एकमेव, सर्वात लहान, सर्वात सुंदर, बॅक-वॉटर ट्रान्सपोर्टसाठी प्रसिद्ध असलेला युरोपियन देश म्हणजे व्हॅटिकन सिटी. हा अधिकृतपणे जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो.
या देशात तुम्हाला एकही मुस्लिम सापडणार नाही. हा ख्रिश्चन बहुसंख्य देश आहे आणि त्याचे राज्य प्रमुख देखील पोप आहेत आणि जगभरात पसरलेल्या 1.2 अब्ज ख्रिश्चनांचे धार्मिक नेते आहेत. या देशात पोपच्या राजवटीमुळे येथे एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही.
देशाला स्वतःचे सैन्य नाही
400 लोकसंख्या असलेल्या या देशाची स्वतःची कोणतीही सेना नाही. हा देश इटलीची राजधानी रोमच्या आत वसलेला आहे. म्हणूनच हा देश इटालियन आर्मी स्विस गार्डद्वारे संरक्षित आहे.
व्हॅटिकन सिटीचे रक्षण करण्यासाठी पोप (ख्रिश्चन धर्मगुरूंनी) अनेक वर्षांपूर्वी स्विस मिशनऱ्यांची रचना केली होती. 2019 च्या आकडेवारीनुसार, या देशाची लोकसंख्या फक्त 453 आहे आणि काही नागरिक परदेशात राहतात, ज्यांची संख्या 372 आहे. अशा प्रकारे या देशाची ओळख सर्वत्र निर्माण झालेली आहे.