Expensive fight in Boxing History : जागतिक बॉक्सिंग चे नाव घेतले गेले की मुहम्मद अली, रे रॉबिन्सन, जो लुईस, माइक टायसन आणि इव्हेंडर होलीफिल्ड यांची नावे घेतली जातात. या चॅम्पियन खेळाडूंनी बॉक्सिंगचा प्रसार जगभर केला होता.
आज तुम्हाला जगातील बॉक्सिंगमधील सर्वात फाईटबद्दल सांगणार आहोत. या लढतीमध्ये ठरणाऱ्या व्यक्तीलाच १००० कोटी मिळाले होते तर तुम्ही अंदाज लावू शकता जिंकणाऱ्याला किती रुपये मिळाले असतील.

जगातील सर्वात महागडी बॉक्सिंग लढत
जगातील सर्वात महागडी बॉक्सिंग फाईट 2015 मध्ये झाली होती. अमेरिकन बॉक्सर फ्लॉइड मेवेदर आणि फिलिपाइन्सचा मॅनी पॅक्विआओ यांच्यामध्ये जगातील सर्वात महागडी बॉक्सिंग फाईट झाली होती. या बॉक्सिंग फाईटवर आयोजकांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
सर्व तिकिटे 1 मिनिटात विकली गेली होती
अमेरिकन बॉक्सर फ्लॉइड मेवेदर आणि फिलिपाइन्सचा मॅनी पॅक्विआओ यांच्यामध्ये होणाऱ्या बॉक्सिंग फाईट सामन्याची तिकिटे फक्त १ मिनिटांमध्ये विकली गेली होती. या सामन्याची क्रेझ इतकी होती की चाहत्यांनी यासाठी हजारो डॉलर्स मोजले होते.
या दरम्यान, 16,800 प्रेक्षक क्षमता असलेल्या ‘एमजीएम ग्रँड’ स्टेडियममध्ये सर्वसामान्यांसाठी केवळ 500 तिकिटे देण्यात आली. त्यांची किंमत $1,500, $2,500, $3,500, $5,000 आणि $7,500 होती, पण तिकिटे 1 मिनिटात विकली गेली.
एमजीएम ग्रँड गार्डन एरिना अमेरिकेतील या स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये अमेरिकन बॉक्सर फ्लॉयड मेवेदर 5 वेळा विश्वविजेता ठरला होता. तसेच फिलिपाइन्सचा मॅनी पॅकियाओ 8 वेळा विश्वविजेता ठरला होता. तसेच यावेळची लढत एकसारखी मानली जात होती.
Floyd Mayweather जिंकला
2 मे 2015 या दिवशी जगातील सर्वात महागडी आणि सर्वात मोठी बॉक्सिंग फाईट झाली होती. Floyd Mayweather यासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला. लढत सुरु झाली आणि मेवेदर आपला प्रतिस्पर्धी पॅक्विआओवर तुटून पडला,
पण पॅक्विआओने आपल्या अनुभवाने खचून जाऊ दिले नाही आणि मेवेदरला चिवट झुंज दिली. पण लढतीच्या 12 फेऱ्यांनंतर, न्यायाधीशांच्या पॅनेलने फ्लॉइड मेवेदरला 116-112, 116-112 आणि 118-110 गुणांच्या आघाडीसह विजेता घोषित केले.
विजेते आणि उपविजेते 1 तासात अब्जाधीश झाले
या लढतीमध्ये हजारो रुपयांची बक्षिसे विजेत्या आणि हरलेल्या खेळाडूला देण्यात आले. अवघ्या १तास चाललेल्या लढतीमधील खेळाडू अब्जाधीश झाले. पराभूत होऊनही मॅनी पॅकियाओ याला 1000 कोटी देण्यात आले. तर विजेत्या बॉक्सर मेवेदरला 1,831 कोटी बक्षीस देण्यात आले होते.