Mahindra Thar : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी! नवीन अवतारात लाँच होतेय महिंद्रा थार, शानदार मायलेज आणि स्टायलिश लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Published on -

Mahindra Thar : काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या महिंद्राच्या थार या स्टायलिश कारने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. अशातच आता कंपनी महिंद्रा थार नवीन अवतारात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

शानदार मायलेज आणि फीचर्स तसेच स्टायलिश लूकसह कंपनी आपली आगामी कार लाँच करणार आहे. कंपनीची ही कार लाँच झाल्यानंतर इतर कंपन्यांना टक्कर देईल हे निश्चितच. इतकेच नाही तर या कारमध्ये तुम्हाला जबरदस्त सेफ्टी फीचर्सही पाहायला मिळेल.

नवीन महिंद्रा थार 2023

2018 मध्ये महिंद्राकडून अमेरिकेमध्ये थारवर आधारित व्यावसायिक वाहन Roxor ऑफ-रोडर सादर करण्यात आले होते. परंतु काही दिवसांनंतर या कारच्या विक्रीवर अमेरिकेत बंदी घातली गेली. यामागील कारण म्हणजे या कारचे डिझाइन. थारची रचना जीपच्या डिझाइन ट्रेडमार्कचे उल्लंघन करत होते. याबाबत जीपने असे सांगितले की, ऑफ-रोडरचे डिझाईन दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या विलीस जीपपासून खूप जास्त प्रेरित होते.

महिंद्राची थार SUV ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत सादर करण्याची योजना असून मात्र या ठिकाणीही जीपच्या डिझाइनमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कंपनी नवीन डिझाईन करण्यात आलेली महिंद्रा थार ऑस्ट्रेलियन बाजारात आणेल.

जाणून घ्या नवीनतम किंमत

कंपनीकडून अजूनही या कारच्या किमती जाहीर करण्यात आल्या नाहीत. परंतु असे मानले जात आहे की कंपनी आपली नवीन कार भारतीय बाजारात 15 ते 18 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च करेल. त्यामुळे जर तुम्ही शक्तिशाली कार घेण्याच्या विचारात असल्यास कंपनीची ही आगामी कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe