Maharashtra HSC Result : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा झाली होती. त्यामुळे विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 13 लाखांहून अधिक बसले होते.
आता लवकरच महाराष्ट्र बोर्डाकडून 12वी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. 20 मे नंतर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर निकाल जाहीर करेल. त्यामुळे विद्यार्थी या अधिकृत वेबसाइटवर सहज निकाल पाहू शकतात.
MSBSHSE ने महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २० मे नंतर MHT CET २०२३ ची परीक्षा आयोजित केली जाऊ शकते.
त्यामुळे २० मे नंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजानुसार MHT CET परीक्षा संपल्यानंतर बारावीच्या बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीसीएम अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी 2023 ची परीक्षा 9 मे ते 14 मे 2023 आणि पीसीबी परीक्षा 15 ते 20 मे 2023 दरम्यान आयोजित केली जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत वेबसाइटवर लवकरच महाराष्ट्र SSC आणि HSC निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.
maharesults.nic.in वर निकाल जाहीर केला जाईल
बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून maharesults.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे विद्यार्थी हा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव (नोंदणीकृत) प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
मात्र महाराष्ट्र बोर्डाकडून अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या सल्ल्यानुसार बारावीचे विद्यार्थी निकाल कधी लागणार याची खात्री करू शकतात.