ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर – नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या ICC World Cup साठी बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार पाकिस्तानचा संघ भारतात ICC World Cup 2023 खेळणार नाही. काही दिवसापूर्वी आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण ठरवण्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहे.यामुळे पाकिस्तानने बीसीसीआयला ही धमकी दिली आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आशिया कप 2023 च्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानला देण्यात आली आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वीच टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही असा निर्णय घेतला होता. यातूनच संपूर्ण वाद निर्माण झाला.
पीसीबी अध्यक्षांची बीसीसीआयला धमकी
बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला. यानंतर, पाकिस्तानने आशिया क्रिकेट कौन्सिल (ACC) ला एक ‘हायब्रीड मॉडेल’ ऑफर केले, म्हणजे भारत-पाकिस्तान सामना UAE किंवा इतरत्र व्हावा आणि इतर संघ पाकिस्तानमध्ये असावेत. पण, पीसीबीचा दृष्टिकोन स्वीकारण्यास एसीसीने नकार दिला.
आता हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे की, जर टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसेल तर पाकिस्तानचा संघही आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही. हे जाणून घ्या 2025 मध्ये पाकिस्तान चॅम्पियनशिप ट्रॉफीचे आयोजनही करणार आहे.
नजम सेठी म्हणाले, “बीसीसीआयला हा सामना त्यांच्या नियुक्त स्टेडियमवरच व्हावा, अशी आमची इच्छा आहे. बीसीसीआयने एक चांगला, तर्कशुद्ध निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला पुढे जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
आपल्या संघाच्या (पाकिस्तान) सुरक्षेची चिंता आहे. आयसीसीने या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा, पण बीसीसीआयने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये असे ते म्हणाले.
नजम सेठी पुढे म्हणाले की, भारतीय बेसबॉलपासून ते कबड्डीपर्यंतची टीम पाकिस्तानमध्ये खेळत आहे, त्यामुळे टीम इंडियाला काय अडचण आहे.
हे पण वाचा :- 9 राज्यांमध्ये धो धो पाऊस , अतिवृष्टी-वादळाचा इशारा, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स