LIC Plan : सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ वेगवेगळ्या योजना राबवत असते. याचा फायदाही नागरिकांना होत असतो. अशीच एक एलआयसीची धन वर्षा योजना आहे. तुम्हाला आता या योजनेत गुंतवणूक करून 10 पट पर्यंत जोखीम कव्हर मिळवता येतो.
इतकेच नाही तर या पॉलिसीतील गुंतवणूक 3 वर्षाच्या मुलापासून ते 60 वर्षांपर्यंत सुरु करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या योजनेत एकवेळ प्रीमियम भरून चांगला परतावा मिळू शकतो.काय आहे ही भन्नाट योजना? जाणून घ्या.
जाणून घ्या योजना
या योजनेचे नाव LIC धन वर्षा योजना 866 असे आहे. ही योजना तुम्हाला आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण तसेच बचत या दोन्हींचा लाभ देते. ही योजना वैयक्तिक, सिंगल प्रीमियम, नॉन-पार्टिसिपेट आणि सिंगल प्रीमियम लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेत प्रीमियम एकदाच जमा करावा लागणार आहे. त्यानंतर, तुम्हाला ठराविक कालावधीत जमा केलेल्या रकमेच्या 10 पट परतावा तुम्हाला देण्यात येईल.
जर या योजनेच्या पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. हे लक्षात ठेवा की तुम्हाला ही योजना ऑनलाइन खरेदी करता येणार नाही. तुम्ही ती केवळ LIC एजंटद्वारे घेता येईल.
उपलब्ध आहेत दोन पर्याय
या पॉलिसीचा परिपक्वता कालावधी 15 वर्षांचा असून या योजनेत ग्राहकांना 2 पर्याय दिले आहे. यातील पहिला पर्याय जमा करण्यात आलेल्या प्रीमियमच्या 1.25 पट परतावा देतो. त्यामुळे जर तुम्ही एकरकमी 10 लाख रुपये देऊन पॉलिसी घेतल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला 12 लाख 50 हजार रुपये मिळतात. या कालावधीत धारकाचा मृत्यू झाला तर, त्याच्या नॉमिनीला ही रक्कम देण्यात येते.
असा आहे दुसरा पर्याय
या योजनेच्या दुसऱ्या पर्यायात, 10 पट जोखीम कव्हर उपलब्ध असून म्हणजेच 10 लाखांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला 1 कोटीचे रिस्क कव्हर मिळते. अशा जर विमा कालावधीत धारकाचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मिळतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पॉलिसी तुम्ही 3 वर्षाच्या मुलापासून ते 60 वर्षांपर्यंत घेऊ शकता. या पॉलिसीमुळे फक्त पैसे सुरक्षित होत नाही, तर भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार होता.