7th Pay Commission: खुशखबर ! ‘या’ लोकांच्या खात्यात येणार 1.20 लाख रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती

Published on -

7th Pay Commission: मोदी सरकार येणाऱ्या काही दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी देऊ शकते.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या काही दिवसापूर्वी सरकारने मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात संपूर्ण 1 लाख 20 हजार रुपये येणार आहेत.

सध्या वाढीव पगारासोबतच सरकार या महिन्यात डीएमध्येही वाढ करणार असल्याची चर्चा जोरात आहे. ज्याचा देशातील 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. यासोबतच 3 महिन्यांचे पैसे थकबाकी म्हणून दिले जाणार आहेत.

DA बाबत कामगार मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये AI CPI-IW डेटा जवळपास 132.3 वर पोहोचला होता, त्यानंतर DA मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के केला होता.

डीए वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासह 3 महिन्यांचे पैसे थकबाकीच्या स्वरूपात मिळतील. उदाहरणार्थ, जर कर्मचाऱ्यांचा पगार 30 हजार रुपये असेल तर त्यांच्या पगारात 1200 रुपयांची वाढ होईल. त्यामुळे वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांच्या पगारात 14,400 रुपयांची वाढ होणार आहे.

याशिवाय कॅबिनेट सेक्रेटरी अधिकाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पगारात डीए म्हणून दरमहा 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे. यामध्ये, कॅबिनेट सचिवांचे मूळ वेतन दरमहा 2.50 लाख रुपये आहे, त्यानुसार त्यांच्या वेतनात वार्षिक आधारावर 1.20 लाख रुपयांची डीए वाढ होणार आहे.

DA वर्षातून दोनदा वाढतो

माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की DA सह सरकार कर्मचार्‍यांचे जीवन सुधारते, यासोबतच कर्मचार्‍यांच्या पगारातही वाढ केली जाते. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. डीएच्या स्वरूपात वाढीव रक्कम सरकारी कर्मचारी, क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली जाते.

हे पण वाचा :- अर्रर्र .. 30 मे पासून ‘या’ 2 राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार उलथापालथ ; जाणून घ्या कारण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!