मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता शहरात वंदे भारतच्या धर्तीवर ‘या’ लोकल ट्रेन सुरु होणार, रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली, कसा असणार प्रकल्प?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Vande Metro Local Train : मुंबई शहरातील आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लोकलचे मोठे महत्त्वाचे स्थान तयार झाले आहे. यामुळे मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते.

दरम्यान आता मुंबईमधील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी बनवण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकलचा प्रवास गतिमान करण्यासाठी, सुरक्षित बनवण्यासाठी तसेच लोकलमधून होणारे अपघातात नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून आता मुंबई शहरात वंदे भारत प्रमाणेच वंदे मेट्रो सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी रेल्वे बोर्डाने 238 वंदे मेट्रो बांधणीच्या कामाला मंजुरी देखील दिली आहे.

हे पण वाचा :- शेअर मार्केटमध्ये वयाच्या कितव्या वर्षापासून पैसे गुंतवले जाऊ शकतात? शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा नियम काय, पहा….

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत या वंदे मेट्रो तयार केल्या जाणार असून याला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली असून याचे पत्र मुंबई रेल्वे विकास महामंडळाला काल अर्थातच शुक्रवारी पाठवले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये वंदे मेट्रो ची संकल्पना मांडली होती.

यानुसार आता रेल्वे मंडळाने या वंदे मेट्रो ट्रेनच्या बांधणीच्या कामाला मंजुरी दिली आहे. आता या वंदे मेट्रो डिसेंबर 2023 पर्यंत तयार होणार असून याचा लाभ प्रवाशांना यावर्षी अखेरच मिळणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सुरू होणाऱ्या वंदे मेट्रो लोकल ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बंद झालेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरू, केव्हा धावणार? पहा….

त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. आता रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या एमयूटीपी 3 आणि एमयूटीपी 3 अ अंतर्गत 238 वंदे मेट्रो लोकलची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एकंदरीत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्प अंतर्गत ज्या वातानुकूलित लोकल बांधणे प्रस्तावित होते त्या सर्व एसी लोकल आता वंदे मेट्रो राहणार आहेत. म्हणजेच एसी लोकलचा पर्याय म्हणून शहरात आता वंदे मेट्रो सुरु होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे निश्चितच शहरातील लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढला; आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार 42 टक्के DA, वाचा सविस्तर