Vivo Cheapest Smartphone : त्वरा करा! 64MP कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसर असणाऱ्या विवोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

Ahmednagarlive24 office
Published:

Vivo Cheapest Smartphone : जर तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्हाला आता Vivo दोन 5G स्मार्टफोनवर हजारोंची बचत करता येईल. तुम्ही Vivo Y100 आणि Vivo Y100A हे स्मार्टफोन 23,999 रुपयांना खरेदी करू शकता.

कंपनीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये फक्त चिपसेटचा फरक आहे. जर किमतीचा विचार केला तर 20 हजारांपेक्षा जास्त बजेटमध्ये हे फोन लॉन्च केले होते. परंतु आता याच फोनच्या किमती आता कमी केल्या असून काही ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.

Vivo Y100 आणि Vivo Y100A किंमत जाणून घ्या

कंपनीकडून Vivo Y100 आणि Vivo Y100A हे दोन्ही स्मार्टफोन्स 24,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आले होते. दरम्यान हे दोन्ही स्मार्टफोन 1000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध होणार आहेत असे आता कंपनीने जाहीर केले आहे. या फोनसाठी तुम्हाला 23,999 रुपये किंमत मोजावी लागणार आहे. ही किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची आहे.

दरम्यान Vivo Y100A चा उच्च प्रकार असून ज्यात ग्राहकांना 8GB RAM आणि 256GB स्टोरेज दिले जाणार आहे. या व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये असून कंपनीकडून त्याची किंमत 24,999 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

पहा ऑफर

या स्मार्टफोन्सवर कंपनीकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जात ​​आहे. बँक ऑफर अंतर्गत यावर 2000 रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामुळे, तुम्ही हे स्मार्टफोन्स 21,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. ग्राहकांसाठी ही सवलत ऑफर SBI,फेडरल बँक,ICICI बँक, IDFC बँक, येस बँक आणि AU बँक वर मिळत आहे. इतकेच नाही तर ही सवलत ईएमआय व्यवहारांवरही उपलब्ध असणार आहे.

पहा फीचर्स

कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन्स 6.38-इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले सह येत आहेत. स्क्रीन 90Hz रिफ्रेश दर आणि 1300 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतात. Vivo Y100 मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर दिला आहे, तर Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर Vivo V100A मध्ये उपलब्ध आहे.

हे दोन्ही फोन 8GB रॅम सह तुम्हाला खरेदी करता येतील. जर या फोनच्या ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने 64MP प्राइमरी लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात येत आहे. तसेच 2MP चे इतर दोन सेन्सरही उपलब्ध असणार आहेत. या फोनच्या फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. हे दोन्ही फोन 4500mAh बॅटरी आणि 44W चार्जिंग सपोर्टसह येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe