अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरिकेशन बंगल्याजवळ झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बिरोबावाडी येथील वाघ्यामुरळी दाम्पत्य जागीच ठार झाले.
गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक कार सोडून फरार झाला. या अपघाताबाबत माहिती अशी,कार राहुरीफॅक्टरी कडून देवळालीच्या दिशेने भरधाव वेगात जात होती.
याचवेळी वाघापुरे हे दाम्पत्य दवाखान्यात जाण्यासाठी मोटारसायकलवरून राहुरी फॅक्टरीकडे निघाले होते.दुपारी ४ वाजता देवळाली इरिगेशन बंगला परिसरात या मोटारसायकलला कारने जोराची धडक दिली
कारचा वेग इतका प्रंचड होता की,कारने दोघा पतीपत्नीला दोनशे फूट फरपटत नेले.या अपघातात भारत शंकर वाघापुरे( वय ५१) व अनिता भारत वाघापुरे (वय ४७)हे दांम्पत्य जागीच ठार झाले. दरम्यान अपघातानंतर कारचालक फरार झाला असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®