Ahmednagar City News : आमदार संग्राम जगताप यांनी सीना नदीच्या पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये !

Published on -

Ahmednagar City News : कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाच्या कामासाठी तत्कालीन खासदार स्व. दिलीप गांधी यांनी प्रस्ताव पाठवून प्रयत्न सुरु केले होते. २०१४ साली देशात परिवर्तन झाल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रध्यानाने कामास मंजुरी देत स्वतः नगरमध्ये येवून कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे भूमिपूजन केले होते.

या रस्त्याच्या कामामधून अंदाजपत्रकातील सुमारे ४३ कोटी रुपयांची बचत झाली होती. वाचलेल्या या ४३ कोटी रुपये नगर शहराच्या विकासासाठी मिळावेत, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती.

यामधून नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपूल ते शिवाजीनगर, अमरधाम ते सक्कर चौक रस्त्याचे दुहेरीकरण करणाच्या कामाचा समावेश होता. तसे पत्र खा. गांधी यांनी २२ फेब्रुवारी २०१७ ला दिले होते.

ही वस्तुस्थिती असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार करीत आहेत, अशी टीका माजी नगरसेवक सुवेंद्र यांनी केली. ते पुढे म्हणाले की नगरच्या राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयाने अंदाजपत्रक तयार केले होते.

त्यास ७ फेब्रुवारी २०१८ साली राज्याचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी मंजुरीही दिली होती. ४३ कोटीनिधीच्या मंजुर डीपीआर मध्ये या पुलाच्या कामासह तीन किलोमीटर रस्त्याचे दुहेरीकरण, कॉक्रीटीकरण, पथदिवे, बंद गटार आदी होणाऱ्या कामांचा उल्लेख होता. नगर कल्याण रोडवरील सीना नदीवर होणाऱ्या पुलाचे काम तत्कालीन गांधी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झाले आहे, असा दावा त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe