Nothing Phone 2 : ठरलं! 4700mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह लाँच होणार Nothing Phone 2, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Published on -

Nothing Phone 2 : नथिंग या स्मार्टफोन निर्माता कंपनीने काही दिवसातच मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Nothing Phone 1 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.

अशातच आता नथिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात Nothing Phone 2 लाँच केला जाणार आहे. कंपनीचा आगामी फोन 4700mAh बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे. दरम्यान या फोनची किंमत आणि खासियत जाणून घ्या.

नथिंग हा युरोपियन ब्रँड असून युरोपनुसार त्याची लॉन्च तारीख नमूद करण्यात आहे. कंपनीने याबाबत अगोदरच पुष्टी केली आहे की हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ, नेटवर्क कनेक्टिव्हिटी तसेच कॅमेरा क्षमता जास्त चांगली मिळणार आहे. आता कार्ल पेईने फोनचे इतर तपशीलही शेअर केले आहेत.

कार्लकडून या स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा फोन 1 पेक्षा मोठ्या बॅटरीसह येणार आहे. यासह कार्ल पेईने नथिंग फोन 2 च्या लॉन्च टाइम लाइनला छेडले आहे. जाणून घेऊयात या फोनचे तपशील.

Nothing Phone 2 मध्ये कंपनीकडून Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर वापरला जाणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येऊ शकतो. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणारी AMOLED स्क्रीन उपलब्ध असणार आहे. दरम्यान स्क्रीनच्या आकाराबद्दल कोणतीही माहिती नाही. कंपनी 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले देऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

तसेच स्मार्टफोनच्या बॅटरी वैशिष्ट्यांची पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन 4700mAh बॅटरीसह येईल, जो नथिंग फोन 1 पेक्षा मोठा असणार आहे. कंपनीकडून नथिंग फोन 1 मध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!