आज अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह ‘त्या’ 13 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाची माहिती

Ajay Patil
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : आज मे महिन्याचा सेकंड लास्ट दिवस. येत्या 2 दिवसांत जून महिन्याला सुरुवात होणार आहे. साहजिकच आता शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सूनचे लवकर आगमन व्हावे अशी आता प्रत्येकाचीच इच्छा आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला मान्सूनची प्रतीक्षा आहे. अशातच राज्यात पूर्व मौसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

आज अर्थातच 30 मे 2023 रोजी देखील राज्यात पूर्व मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरं पाहता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाची तीव्रता गेल्या काही दिवसांत वाढली आहे. तापमान 40 अंश सेल्शियसच्या आसपास आहे.

हे पण वाचा :- ‘हा’ स्टॉक ठरला शेअर मार्केटचा बादशाह ! ‘इतक्या’ वर्षातच गुंतवणूकदाराचे 60 हजाराचे बनवलेत 10 कोटी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आली फळाला

दरम्यान आता भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काल म्हणजे 29 मे रोजी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अर्थातच जळगाव धुळे नंदुरबार नासिक अहमदनगर या भागात आणि विदर्भात तापमान 40°c च्या पुढे गेले आहे. तर उर्वरित राज्यात तापमान 34 अंश ते 40 अंश सेल्शियसच्या दरम्यान होते.

याचाच अर्थ राज्यातील काही भागात मानसून पूर्व पाऊस पडत असला तरी देखील तापमानामुळे उकाडा कायम आहे. पण आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पूर्व मौसमी पाऊस पडणार आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्यातील ‘या’ महापालिकेत 1178 रिक्त पदांच्या जागांसाठी मेगाभरती; कोणते उमेदवार राहणार पात्र? वाचा….

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता राहणार आहे. 

तसेच मध्य महाराष्ट्र मधील अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा विभागात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात वादळी पाऊस पडू शकतो.

सोबतच विदर्भ विभागात वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

एकंदरीत राज्यातील 19 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. पण यामुळे खरीप हंगामापूर्वी केल्या जाणाऱ्या शेतीच्या मशागतीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाली; मे महिन्याच्या वेतनासोबतच मिळणार लाभ, शासन निर्णय निघाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe