Monsoon Update : मे महिना संपण्याच्या मार्गांवर आहे आणि चाहूल लागली आहे ती मान्सूनच्या आगमनाची. शेतकरी बांधव शेत शिवारात खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत करण्यात व्यस्त असून आभाळाकडे डोळे टेकून मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. खरं पाहता, नेहमी एक जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होत असते.
यानंतर मान्सून साधारणता सहा दिवसानंतर अर्थातच सात जूनच्या सुमारास तळकोकणात दाखल होत असतो. यानंतर मग पुढे मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यंदा मात्र परिस्थिती खूपच भिन्न आहे. यंदा अंदमानात 19 मे ला अर्थातच तीन दिवस लवकर मान्सूनचे आगमन झाले.
तीन दिवस लवकर आगमन झाले म्हणून केरळात देखील लवकर मान्सूनचा पाऊस पोहोचेल असं सामान्य जनतेला वाटतं होत. मात्र भारतीय हवामान विभागाने तेव्हाच स्पष्ट केले होते की, जरी यंदा मान्सूनच आगमन अंदमानात लवकर होत असलं तरीही तो केरळमध्ये उशिराने पोहोचणार आहे.
हे पण वाचा :- पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, संपूर्ण रूट, थांबे, टायमिंगबाबत वाचा…
भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज आता खरा ठरत असल्याचे चित्र आहे. मान्सून जवळपास 11 दिवसांपासून अंदमान मध्येच मुक्कामाला आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर 30 मे म्हणजे आजपर्यंत मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक हवामान तयार झाले नाही.
आता मात्र अचानक हवामानात बदल झाला असून मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक हवामान बनले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे पुढे सरकू लागला आहे. शिवाय पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून पुन्हा या प्रदेशाच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे निरीक्षण IMD ने नोंदवले आहे.
हे पण वाचा :- दहावी, बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! कोलफिल्डमध्ये 608 पदांच्या रिक्त जागासाठी मेगाभरती, आजच करा अर्ज
निश्चितच ही एक दिलासादायक बाब असली तरी देखील अद्याप मान्सून केरळमध्ये केव्हा दाखल होतो याबाबत संभ्रमावस्था पहावयास मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे केरळात आगमन चार जून 2023 ला होणार आहे. परंतु यामध्ये चार दिवस मागे किंवा चार दिवस पुढे होऊ शकतात.
याचाच अर्थ जर मान्सूनसाठी पोषक हवामान राहील नाही तर मान्सूनचे केरळात आगमन 8 जूनलाही होऊ शकत. निश्चितच ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक सिद्ध होऊ शकते. मात्र मान्सूनचा प्रवास आता अकरा दिवसाच्या विश्रांतीनंतर सुरू झाला आहे, यामुळे लवकरच मान्सून मोठी प्रगती करत महाराष्ट्र जवळ करेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, कसा राहणार मार्ग? वाचा….