iQOO CGO : सध्या स्मार्टफोनचा वापर जास्त वाढला आहे. अनेकजण स्मार्टफोन फक्त गेम खेळण्यासाठी करत आहेत. लहान मुलांपासून ते तरुण वर्गापर्यंत गेम खेळली जात आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे परंतु त्यासोबत मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे.
अशातच जर तुम्हालाही गेम खेळण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुमचा गम खेळून एक दोन हजार नव्हे तर लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. कारण एक नामवंत कंपनी गेम खेळण्यासाठी 10 लाख रुपये देत आहे.

काय आहेत अटी?
पात्रता निकषांच्या स्वरूपात फक्त काही गोष्टी गरजेच्या आहेत. जसे की तो एक उत्साही उमेदवार असावा. ज्याचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो भारतीय रहिवासी असावा.
काय काम असणार?
जर कामाचा विचार केला तर CGO चे काम iQoo फोनवर गेम खेळून तो अनुभव शेअर करणे आणि पुनरावलोकन करणे हे असणार आहे. एक प्रकारे तो मोबाईल गेमर्सचा आवाज बनू शकतो. याबाबत कंपनीने असे सांगितले की, “iQoo च्या मुख्य गेमिंग अधिकाऱ्याला फक्त iQOO मधील संघांशी संलग्न होण्याची संधी मिळणार नाही, तसेच त्यांना अनुभव सामायिक करण्यासाठी देशभरातील शीर्ष गेमर आणि गेमिंग समुदायाशी जोडण्याची संधी मिळणार आहे.”
सांगावे लागणार गेमिंग इनसाइटबद्दल
तसेच, मुख्य गेमिंग अधिकाऱ्याला गेमर्ससाठी संपूर्ण स्मार्टफोन पॅकेज तयार करण्यासाठी गेमिंग अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करावी लागणार आहे, ज्यात गेमप्ले, गेमिंग शैली, सादरीकरण आणि गेमिंग व्याख्या यांचा समावेश असणार आहे. इतकेच नाही तर त्यांना भारतभरातील टॉप गेमर्स आणि गेमिंग समुदायासोबत काम करण्याची अनोखी संधी यामुळे मिळणार आहे.
याबाबत iQOO चे CEO निपुण मेरीया यांनी सांगितले आहे की, “आम्ही Gen Z ची गेमिंगमधील आवड आणि सहभाग ओळखतो. तसेच त्यांच्या विशिष्ट प्राधान्यांसह, त्यांच्याकडे गेमिंग आणि मनोरंजनाच्या लँडस्केपला पुन्हा आकार देण्याची ताकद आहे. आमचे उद्दिष्ट केवळ मार्ग दाखवणे हा आहे.
IQOO चा मतानुसार, भारताच्या गेमिंग लँडस्केपने एक नवीन उंची गाठली आहे. ज्यात जागतिक गेम डाउनलोड्सपैकी 17 टक्के Gen Z चा वाटा आहे.
अशी करा नोंदणी
- सर्वात अगोदर स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी, iQoo च्या वेबसाइटवर नोंदणी फॉर्म भरावा लागणार आहे.
- तुम्ही एकदा नोंदणी फॉर्म भरला की त्यानंतर, त्याची तपासणी करण्यात येईल, त्यानंतर तपशीलवार अर्ज, गेमिंग फेरी आणि ऑडिशन असणार आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून असणार आहे.