Atal Pension Yojana: सध्या केंद्र सरकारकडून एकापेक्षा एक भन्नाट आणि जबरदस्त योजना राबविले जात आहे. ज्याच्या फायदा आज देशातील लाखो लोक घेताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील गुंतणवूक करण्यासाठी एक बेस्ट योजना शोधात असाल तर आम्ही तुम्हाला आज केंद्र सरकारची लोकप्रिय योजना अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती देणार आहोत.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेत तुम्हाला दरमहा भरीव पेन्शन मिळू शकते. या योजनेत तुम्ही दरमहा 210 रुपये गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. तुम्ही जितक्या लवकर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात कराल. तुम्हाला तितका जास्त नफा मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या योजनेत 210 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीनुसार दरमहा पेन्शन मिळेल.

ही पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू झाली होती. या पेन्शन योजनेला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. तुम्हाला या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, सक्रिय मोबाइल नंबर आणि बचत खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळवायचे आहे, या आधारावर दर महिन्याला तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. योजनेत 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 42 ते 210 रुपये भरावे लागतील.
इतकी मिळणार पेन्शन
जर 18 वर्षांच्या व्यक्तीने दरमहा 42 रुपये जमा केले तर 60 वर्षांनंतर त्याला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल. 84 रुपये जमा केल्यावर तुम्हाला 2000 रुपये पेन्शन मिळेल. आणि 210 रुपये जमा केल्यावर दरमहा 5,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील.
दुसरीकडे, 40 वर्षांच्या व्यक्तीला 5,000 रुपयांच्या पेन्शनसाठी 1,454 रुपये जमा करावे लागतील. अशाप्रकारे 19 वर्षे ते 39 वर्षे वयोगटातील लोकांसाठी वेगळे खातेही ठरवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार हप्ता घेऊ शकता.
हे पण वाचा :- Vastu Tips: महिलांनो सावधान! उकळते दूध सांडले तर मिळतात ‘हे’ अशुभ संकेत, वाचा सविस्तर