Mumbai Goa Vande Bharat Express New Timetable : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान तीन जून 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. तीन जूनला अर्थातच येत्या शनिवारी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव रेल्वे स्थानकावरून मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा बावटा दाखवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या ट्रेनला 3 जूनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे मात्र ही गाडी पाच जून पासून प्रवाशांच्या सेवेसाठी नियमित सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या ट्रेनच्या वेळापत्रका संदर्भात आणि थांब्यासंदर्भात मध्य रेल्वेच्या माध्यमातून मोठी माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….
मध्य रेल्वेने नुकतेच या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे अंतिम आणि सुधारित वेळापत्रक तसेच थांब्यांबाबत माहिती देणारे परिपत्रक निर्गमित केले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक कसे राहणार, या गाडीला कुठे थांबा दिला जाणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मध्य रेल्वेने या ट्रेनचे वेळापत्रक कशा पद्धतीने सेट केले आहे? तसेच या गाडीला कुठे थांबा दिला जाणार आहे? या संदर्भात काढण्यात आलेल्या परिपत्रकाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय
कसं राहणार वेळापत्रक?
मध्य रेल्वेने काढलेल्या परिपत्रकानुसार सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहे. ही ट्रेन सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून मडगाव कडे रवाना होणार असून दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.
तसेच मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहे. ही गाडी मडगाव रेल्वे स्थानकावरून दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर रात्री दहा वाजून 25 मिनिटांनी पोहोचणार आहे.
कुठे राहणार थांबे?
आतापर्यंत या ट्रेनच्या स्टॉपेज संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये वेगवेगळी माहिती समोर येत होती. मात्र आता रेल्वेने एक परिपत्रक निर्गमित केले असून यानुसार ही गाडी दादर, ठाणे,पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज