WhatsApp Bug : WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. सध्या WhatsApp वर एक बग सापडला आहे. त्यामुळे कंपनीचे Android अॅप क्रॅश होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
परंतु या बगमुळे काळजी करू नका. आता तुम्ही या प्रकारच्या बगचे सहज निराकरण करू शकता. फक्त सध्या व्हायरल होत असणाऱ्या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. नाहीतर तुम्हीही संकटात सापडू शकता. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
काय आहे बग?
अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या एका अहवालानुसार, सध्या व्हॉट्सअॅपला एका बगचा सामना करावा लागत असल्याने त्यांचे अँड्रॉइड अॅप क्रॅश होत आहे. ज्यावेळी वापरकर्ते wa.me/settings ही लिंक असणारी वैयक्तिक किंवा गट चॅट उघडतात त्यावेळी तो बग ट्रिगर होतो. या लिंकने व्हॉट्स अॅपचे सेटिंग्ज पेज उघडले पाहिजे, मात्र सध्या ते Android डिव्हाइसवर क्रॅश होताना दिसत असल्याचे समोर आले आहे.
Don't send this message(https://t.co/wKuoDv7bMr) to anyone chat.otherwise it will Crash WhatsApp(happened only in Android)if already send it than use WhatsApp web or desktop application to delete this.@WhatsApp @Meta #whatsappcrash #wamesettings #meta #bug pic.twitter.com/y0QATSWHiO
— PandyaMayur (@pandyaMayur11) May 25, 2023
चुकूनही लिंकवर क्लिक करू नका
हा बग WhatsApp बिजनेससह वैयक्तिक आणि गट चॅट दोन्हीवर परिणाम करत आहे. जर तुम्ही चुकून या लिंकवर क्लिक करून चॅट ओपन केली तर क्रॅश होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. परंतु त्यानंतर अॅप सामान्यपणे रीस्टार्ट होत असून हा बग Android मधील WhatsApp च्या 2.23.10.77 आवृत्तीवर खूप मोठा परिणाम करत आहे. एक रिपोर्टनुसार, या बगचा इतर आवृत्त्यांवरही परिणाम होत आहे.
असा करा बग दुरुस्त
जर तुम्हालाही अशीच समस्या येत असेल तरआता यावर एक सोपा उपाय आहे. व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप वेबच्या ब्राउझर आवृत्तीवर बगचा परिणाम झाला नसल्याने तुम्हाला तुमच्या ब्राउझरद्वारे व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करता येते आणि क्रॅश होत असणारा संदेश किंवा चॅट हटवू शकता. जोपर्यंत तुम्हाला पुन्हा तीच लिंक मिळत नाही तोपर्यंत तुमच्या फोनवरील तुमचे WhatsApp क्रॅश होऊ शकणार नाही.