Cotton Farming : कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….


चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे कबड्डी आणि पंगा वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. या वाणाच्या बियाण्याची काळाबाजारी होत असून आठशे रुपये किमतीची ही कापसाची बॅग आता बाराशे ते तेराशे रुपये किमतीवर विक्री होत आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : येत्या काही तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच अर्थ आता महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकपेरणीसाठी खतांची आणि बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे राज्यातील काही भागात शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी देखील सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते शेतकरी कापूस पीक पेरणी करत आहेत.

कापूस हे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. येत्या हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांनी कापसाच्या पंगा आणि कबड्डी या वाणाला पसंती दिल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ नवविवाहित जोडप्यांना मिळणार 50 हजाराचं प्रोत्साहन अनुदान ! पण…..

चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे कबड्डी आणि पंगा वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. या वाणाच्या बियाण्याची काळाबाजारी होत असून आठशे रुपये किमतीची ही कापसाची बॅग आता बाराशे ते तेराशे रुपये किमतीवर विक्री होत आहे.

काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिक किमतीत कापसाचे हे वाण विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची या काळाबाजारीमुळे फसवणूक होत आहे.

म्हणून याकडे कृषी विभागाने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना आवश्यक ते वाण योग्य दरात उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, आज आपण या दोन्ही जातीच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाब डख सुधारित मान्सून अंदाज 2023 : 3 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस !

कापसाची पंगा जात :- ही कापसाची एक सुधारित जात असून राज्यातील कॉटन बेल्ट म्हणून विख्यात असलेल्या विदर्भात आणि मराठवाड्यात या जातीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकऱ्यांमध्ये हा वाण विशेष लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या कापूस पिकात फांद्यांची संख्या जास्त असते.

कापूस बोंडांची संख्या देखील अधिक असते. कापूस बोंड हे वजनदार असते, साधारणतः सहा ते सात ग्रॅम बोंडाचे वजन राहते. या जातीचा कापूस वेचणीस सोपा असतो. ही लवकर परिपक्व होणारी व्हरायटी आहे. या जातीची रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! तलाठी भरती निघाली; 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार, केव्हा होणार परीक्षा? वाचा….

कापसाची कबड्डी जात :- हा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीची देखील राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होते. या जातीचे कापूस पीक मजबूत राहते. जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या कापूस वाणाची लागवड शक्य असते. ही जात रस शोषक कीटकांसाठी सहनशील आहे.

या जातीचे कापूस बोंड देखील मोठे असते, बोंडाचे वजन साधारणतः सहा ग्रॅम पर्यंत भरते. या जातीची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर दोन फूट आणि दोन ओळींमधील अंतर चार फूट ठेवले तर चांगले उत्पादन मिळते. पेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर पेरलं पाहिजे. ही जात अधिक उत्पादन देण्यासाठी ओळखली जाते तसेच या जातीचा कापूस वेचणीसाठी सोपा राहतो. 

हे पण वाचा :- दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….