Nissan Magnite : त्वरा करा! ‘या’ शानदार SUV वर मिळत आहे 62 हजारांची सवलत, ऑफर फक्त 30 जून पर्यंत

Ahmednagarlive24 office
Published:
Nissan Magnite

Nissan Magnite : निसान या ऑटोमोबाइल कंपनीची Nissan Magnite ही सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. याच एसयूव्हीवर आता एकूण 62 हजारांची सवलत कंपनीकडून देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही ऑफर फक्त 30 जून पर्यंत उपलब्ध आहे.

त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा लागणार आहे. किमतीचा विचार केला तर कारची किंमत 5,99,900 रुपये इतकी आहे. तीच तुम्हाला आता मूळ किमतीपेक्षा 62 हजारांच्या सवलतीत खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या ऑफर

दरम्यान आता ही कंपनी या महिन्यात या कारवर एकूण 62 हजार रुपयांपर्यंतचा फायदा देत असून या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात रु. 20,000 चा एक्सचेंज बोनस, रु. 10,000 किमतीच्या अॅक्सेसरीज, रु. 10,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट आणि रु. 10,000 च्या लॉयल्टी बोनसचा समावेश केला आहे.

त्याच्या ऑनलाइन बुकिंगवर 2000 रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जात आहे. समजा ग्राहकांनी Nissan Renault कडून 2 वर्षांसाठी 4 लाख रुपये फायनान्स केले तर त्यांना 6.99% व्याजदराने कर्ज मिळू शकते. परंतु हे लक्षात घ्या की ही ऑफर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वैध असणार आहे.

इंजिन आणि फीचर्स

या कारमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल जे 100hp पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करते. तसेच यात 1.0-लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात येत आहे. हे इंजिन 71hp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते आणि हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे.

यात तुम्हाला ड्युअल एअरबॅग्ज, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक आणि अराउंड व्ह्यू मॉनिटर यांसारखे अनेक सेफ्टी फीचर्स दिली जात आहेत. तर याच्या केबिनमध्ये एबीएस, ईबीडी, एचएसए, एचबीए यांसारख्या वैशिष्ट्यांसह 7-इंचाची टीएफटी स्क्रीन, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर, अॅम्बियंट मूड लाइटिंग, रियर पार्किंग सेन्सर्स, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट यासारख्या फीचर्स दिली जात आहे.

मॅग्नाइटची गिझा एडिशन लॉन्च

निसानने मॅग्नाइटचे गेझा एडिशनही लॉन्च केली असून तिची एक्स-शोरूम किंमत 7.39 लाख रुपये इतकी आहे. गिझा एडिशन वन-अबोव्ह-आधारित XL व्हेरियंटवर तयार करण्यात आले आहे. तिची किंमत 35,000 रुपयांनी जास्त आहे. हे बेस-स्पेक 1-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह दिले आहे. हे लक्षात घ्या की जपानी भाषेत गिझा म्हणजे ऑफ-स्टेज संगीत आणि ध्वनी प्रभाव होय.

जाणून घ्या मुख्य फीचर्स

  • 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
  • वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले
  • जेबीएल साउंड सिस्टम
  • मागील पार्किंग कॅमेऱ्यासह मार्गदर्शिका
  • सभोवतालच्या प्रकाशासह अॅप-सर्वोत्तम नियंत्रणे
  • शार्क फिन अँटेना
  • बेज कलर अपहोस्ट्री
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe