Sahara Group : जर तुम्हीही सहारा समूहाच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता सहारा इंडिया लाइफ इन्शुरन्स या दिग्गज कंपनीचा जीवन विमा व्यवसाय SBI Life Insurance मध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता याचा खूप मोठा फायदा हा गुंतवणूकदारांना होणार आहे. तुमच्यासाठी आता लाखो रुपयांची संधी चालून आली आहे. त्यामुळे अशी संधी चुकूनही गमावू नका. काय आहे हा व्यवसाय जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.
विमा नियामकाकडून एका निवेदनात असे म्हटले आहे की, SILIC ला नियमांचे पालन करण्यासाठी अनेक संधी तसेच पुरेसा वेळ दिला गेला होता. मात्र कंपनी तसे करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणतीही पावले घेण्यात आली नाहीत.
कंपनीचा पोर्टफोलिओ योग्य नाही असे कंपनीच्या पॉलिसी डेटावरून समोर आले आहे. अशातच कंपनीची आर्थिक स्थिती सतत खालावली आहे, कंपनी तोटा सतत सहन करत आहे. त्यामुळे एकूण प्रीमियममधील दाव्यांची टक्केवारी जास्त आहे. समजा जर हाच कल कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळं कंपनीच्या भांडवलावर परिणाम होऊ शकतो. तसेच कंपनी पॉलिसीधारकांच्या दायित्वांची परतफेड करण्यासाठीअपयशी ठरू शकते. जर असे झाले तर पॉलिसीधारकांचे हित धोक्यात येण्याची शक्यता आहे.
यामागचं कारण काय?
तसेच विमा नियामकाकडून असेही सांगितले की आज पार पडलेल्या बैठकीत, SILIC च्या पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कारवाई करणे खूप गरजेचे असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाने कंपनीचा जीवन विमा व्यवसाय तात्काळ प्रभावाने अन्य जीवन विमा कंपनीकडे ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे नियामकाने असे सांगितले की, कंपनीच्या सर्व पॉलिसीधारकांच्या सुरळीत संक्रमणासाठी आवश्यक पावले घेण्यात आली आहेत. या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यात सदस्य (अॅक्चुरियल), सदस्य (जीवन) आणि सदस्य (एफ अँडआय) यांचा समावेश असणार आहे.
तसेच SBI Life ला SILIC च्या पॉलिसीधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व आवश्यक पावले घेण्यास सांगण्यात आले आहे. ते परिस्थितीचे निरीक्षण करणे सुरू ठेवून SILIC च्या पॉलिसीधारकांच्या हितासाठी सर्व आवश्यक निर्देश जारी करू शकते.