Soybean Farming : संपूर्ण भारत वर्षात सोयाबीन या प्रमुख तेलबिया पिकाची लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार आपल्या देशात सोयाबीनचे जवळपास 12 मिलीयन टन उत्पादन घेतले जाते. विशेष बाब म्हणजे यापैकी जवळपास 45% उत्पादन एकट्या मध्य प्रदेश राज्यात आणि 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते.
सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेशचा एक नंबर लागतो आणि महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त आपल्या देशात राजस्थान या राज्यात देखील सोयाबीनचे लागवड विशेष उल्लेख नाही आहे. अलीकडे बिहारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. यंदा देखील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे.

मात्र यावर्षी मान्सून काळात कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कमी पाऊस असला तरी अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणाची पेरणी करणे जरुरीचे आहे. अशा स्थितीत आज आपण कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा
सोयाबीनच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
JS 2034 :- सोयाबीनची ही एक सुधारित जात म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीची देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात पेरणी केली जाते. राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात या जातीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या सोयाबीन दाण्याचा रंग पिवळा, फुलाचा रंग पांढरा आणि शेंगा सपाट असतात. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी पाऊस असतानाही ही जात चांगले उत्पादन देते. दरम्यान यंदा भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशभरात मान्सून काळात कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
यामुळे या जातीची शेती यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी विशेष लाभप्रद सिद्ध होऊ शकते. या जातीपासून जवळपास 24-25 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळतात त्याचा दावा केला जातो. या जातींचे पीक 80-85 दिवसात परीपक्व बनते. अर्थातच तीन महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये या जातीपासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळते.
हे पण वाचा :- पंजाब डख : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस पडणार ! मान्सून आगमन लांबणार ? पहा….
फुले संगम/KDS 726 :- ही महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेली एक सुधारित जात आहे. ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने 2016 मध्ये प्रसारित केली आहे. या जातींचे सोयाबीनची झाडे इतर वनस्पतींपेक्षा मोठी आणि मजबूत असतात.
या जातीची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात होते. शिवाय दक्षिण भारतात देखील या जातीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ही जात तांबेरा रोगास कमी बळी पडते. तसेच पानावरील डाग रोगाला आणि खोडमाशीला प्रतिरोधक आहे.
हा वाण पाने खाणाऱ्या अळ्यांना काही प्रमाणात सहनशील असल्याचा दावा केला जातो. ही जात 100 ते 105 दिवसांत परिपक्व बनत असते. जाणकार लोक सांगतात की या जातीपासून 35-45 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते. निश्चितच या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.