Gharkul Yojana List 2023 : गावानुसार घरकुल यादी ! पहा तुमचे नाव आहे का ?

Ahmednagarlive24 office
Published:

Gharkul Yojana List 2023 : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण “गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी” कशी डाऊनलोड करायची यासंबंधी माहिती घेणार आहोत. आर्थिक वर्ष 2023 24 साठी शासनामार्फत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरकुल योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींनी अर्ज केला होता त्यांचे नाव यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन स्वरूपात ही यादी कशी पाहायची आणि डाऊनलोड करायची यासंदर्भात सविस्तर अशी माहिती तुम्हाला येथे मिळेल.

गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी (Gharkul Yojana 2023 List)

प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत महाराष्ट्रात राबवली जाणारी घरकुल योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांनी योजनेसाठी अर्ज केला होता, ते व्यक्ती घरकुलासाठी पात्र झाले आहेत की नाही यासंदर्भात याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या या अभिनव योजनेद्वारे, आतापर्यंत लाखो लोकांना आपले हक्काचे घर मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गावानुसार घरकुल यादी, अधिकृत पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. घरकुल यादी pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Process सांगितले आहे. त्याचे पालन काळजीपूर्वक करा आणि तुमच्या गावची यादी डाऊनलोड करा.

गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी PDF Download Process in Marathi

गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे क्लिक करा https://rhreporting.nic.in/netiay/ConvergenceReport/HouseSanctionedVsWorkCreatedReport.aspx

वेबसाईटवर पोहोचल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड उघडेल, तिथे तुम्हाला चालू वर्ष तसेच त्याखाली पंतप्रधान आवास योजना असे नाव दिसेल.

योजनेच्या नावाखाली दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. जसे. महाराष्ट्र

नंतर तुमच्यासमोर जिल्ह्याचे नावे येतील, त्यातील तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे.

जिल्हा निवडल्यानंतर त्याखाली अजून एक पर्याय येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्याचे नाव निवडायचे आहे.

पुन्हा त्याखाली तालुक्यामध्ये सर्व गावांची नावे येतील, तुमच्या गावाचे नाव तुम्हाला निवडायचे आहे.

त्यानंतर त्याखाली दिलेल्या Captcha ला Fill करायचे आहे. म्हणजेच बॉक्समध्ये दिलेले गणित सोडवायचे आहे.

त्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. शासनामार्फत जर तुमच्या गावाची यादी प्रसिद्ध झाली असेल, तर सबमिट केल्यानंतर त्याखाली तुम्हाला PDF डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

अशा तऱ्हेने तुम्ही गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी, PDF स्वरूपात ऑनलाईन रित्या अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी संबंधीची माहिती. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe