Disney+ Hotstar : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! मोफत पाहता येणार विश्वचषक आणि आशिया कप सामने, कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Updated:
Disney+ Hotstar

Disney+ Hotstar :  येत्या सप्टेंबरमध्ये आशिया कप सामने सुरू होणार आहेत. अशातच आयसीसी विश्वचषक 2023 ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. तुम्ही आता हे दोन्ही सामने एकही रुपया न भरता पाहू शकता. होय, कारण आता Disney+Hotstar ने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

तुम्ही आता या दोन्ही स्पर्धा स्मार्टफोनवरून Disney+Hotstar वर मोफत पाहू शकता. दरम्यान हे लक्षात घ्या क्रिकेटप्रेमींना नुकतीच पार पडलेली आयपीएल JioCinema मोफत पाहता येत होती. क्रिकेटप्रेमींना आता Disney+Hotstar विश्वचषक आणि आशिया कप सामने मोफत पाहता येणार आहेत.

आशिया कप सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून आयसीसी विश्वचषक 2023 ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे. तुमच्यासाठी दोन्ही स्पर्धा स्मार्टफोनवरून स्‍ट्रीमिंगसाठी मोफत पाहता येणार आहे.

या कारणामुळे घेतले हे मोठे पाऊल

Disney+Hotstar हेड सजिथ शिवनंदन यांनी एका मुलाखतीत सांगितले की Disney+Hotstar देशातील वेगाने वाढत जाणाऱ्या OTT उद्योगात आघाडीवर असून आम्ही दर्शकांचा अनुभव वाढवण्यासाठी नवीन नवकल्पनांवर सध्या काम करत आहोत. आशिया चषक आणि ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लाखो प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देणे, आम्हाला खात्री आहे की, यामुळे आम्हाला संपूर्ण इको-सिस्टम वाढेल.

नुकतेच लाँच झालेल्या JioCinema, अंबानीच्या नेतृत्वाखालील स्ट्रीमिंग सेवेने 2023 मधील इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यासाठी विक्रमी संख्येने दर्शक मिळवले होते. JioCinema, जे IPL 2023 चे अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार होते, त्यांनी क्रिकेट स्पर्धेचे विनामूल्य स्ट्रीमिंग ऑफर केल्याने त्यांची दर्शक संख्या वाढली आहे.

रिलायन्सच्या Viacom18 ने 2023 ते 2027 या कालावधीत IPL डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क विकत घेतले असून जे पूर्वी Disney कडे होते. अंबानीच्या मीडिया उपक्रमाने डिस्नेसह इतर कंपन्यांना चीतपट करून आयपीएलचे डिजिटल अधिकार मिळवले असून सध्या, डिस्नेला भारतातील सशुल्क ग्राहकांच्या निर्गमनाचा सामना करावा लागत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe