LED Vs CFL : घरात जेवढा जास्त उजेड असेल तेवढे घर उजळून दिसते. अशा वेळी लोक बाजारातून सर्वात जास्त प्रकाश देणारे बल्ब खरेदी करत असतात. तसे पाहिले तर फिलामेंट बल्बचे दिवस जवळपास संपले आहेत.
कारण आता लोकांकडे अधिक ऊर्जा मिळ्वण्यासाठी खूप पर्याय आहेत. अशा वेळी लोक कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट बल्ब (CFLs) किंवा लाइट-एमिटिंग डायोड्स (LEDs) घरांमध्ये आणतात. पण, या दोन बल्बपैकी कोणता बल्ब चांगला आहे आणि कोणता बल्ब तुम्हाला अधिक वीजबिल येण्यापासून वाचवेल हे तुम्ही जाणून घ्या.

सर्वप्रथम CFLs आणि LEDs कसे काम करतात याविषयी माहिती करून घेऊया. जेव्हा तुम्ही CFL चालू करता, तेव्हा अल्ट्राव्हायोलेट प्रकाश उत्सर्जित करणारे रसायने (आर्गॉन आणि पारा) असलेल्या ट्यूबमधून वीज जाते. मग हा अतिनील प्रकाश, जो मानवी डोळ्यांना दिसत नाही, ट्यूबच्या आतील फ्लोरोसेंट लेप (फॉस्फर) वर आघात करतो.
यांनतर काही काळाने हे एक्साइटेड कोटिंग प्रकाश उत्सर्जित करते. सीएफएल सुरू होण्यासाठी अधिक वीज वापरतात आणि त्यांना वार्म व्हायला एक किंवा दोन मिनिटे लागतात. परंतु, जेव्हा ते चालू होतात तेव्हा ते समतुल्य फिलामेंट बल्बपेक्षा 70 टक्के कमी वीज वापरतात.
आता जर आपण LED बद्दल बोललो तर ते एक नवीन प्रकाश तंत्रज्ञान आहे. टीव्ही, डिजिटल घड्याळ आणि अनेक उपकरणांमध्ये एलईडीचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही LED चालू करता, तेव्हा तुम्ही डायोड नावाच्या अर्धसंवाहक सामग्रीद्वारे विद्युत प्रवाह पाठवता.
जेव्हा विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रॉन अर्धसंवाहकातून वाहतात तेव्हा प्रकाश निर्माण होतो. हे पारंपारिक बल्बच्या तुलनेत ते 90 टक्के विजेची बचत करतात. जे तुमच्या खूप फायदाचे आहे.
तसेच वीज बचतीच्या दृष्टीने विचार केला तर CFL आणि LED दोन्ही पारंपरिक बल्बपेक्षा जास्त वीज वाचवतात. परंतु, दोनपैकी सर्वात उत्कृष्ट LED आहे. CFL सुमारे 25% अधिक कार्यक्षम आहेत, तर LEDs सुमारे 75% अधिक चांगले काम करतो.
LED आणि CFL दोन्ही जास्त काळ टिकतात. पण, इथेही LEDs पुढे आहेत. जेथे पारंपारिक बल्बचे आयुष्य 1000 तास आहे. तर दुसरीकडे, CFL चे आयुष्य 10,000 तास असते आणि LED चे आयुष्य सुमारे 25,000 तास असते.
एकंदरीत, LEDs CFL पेक्षा जास्त ऊर्जा कार्यक्षम आहेत. तसेच, CFL पेक्षा LED हे आरोग्य आणि पर्यावरणासाठी चांगले आहेत. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार केला तर तुम्हाला LED बल्ब अधिक परवडणारा आहे त्यामुळे तुम्ही तो खरेदी करावा.













