OLA S1 Air: लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Ola ने एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कंपनीने S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 3kWh बॅटरी पॅकसह विकणार आहे.
हे जाणून घ्या कि बाजारात सध्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर धुमाकूळ घालत आहे. मागणी कमी असल्याने निर्णय मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2kWh आणि 4kWh बॅटरी पॅक पर्यायांना कमी मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, ज्यांनी 2kWh किंवा 4kWh बॅटरी पॅक व्हेरियंट बुक केले आहेत त्यांना 3kWh ट्रिमवर स्विच करावे लागेल. ग्राहक त्यांचे बुकिंग रद्द देखील करू शकतात.

Ola S1 Air टॉप स्पीड
ओला इलेक्ट्रिकने गेल्या मे महिन्यात 35,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, Ola S1 Air चा टॉप स्पीड 85 Kmph आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 87 किमी चालते. याचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे.
चार तासांत पूर्ण चार्ज
स्कूटरचे एकूण वजन 99 किलो आहे आणि ती 4.3 तासात पूर्ण चार्ज होते. स्कूटरची शक्ती 2700 W आणि सीटची उंची 792 मिमी आहे. सुरक्षेसाठी यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यात ट्विन प्रोजेक्टर हेडलॅम्प, बॉडी पॅनल्स, सिंगल-पीस सीट आणि मिरर आहेत.

फीचर्स
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्लॅट फूटबोर्ड देण्यात आला आहे. यात TFT स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, राइडिंग मोड, रिव्हर्स मोड, साइड स्टँड अलर्ट, OTA अपडेट्स, म्युझिक प्लेबॅक, रिमोट बूट लॉक, नेव्हिगेशन आणि प्रेडिक्टिव मेंटेनन्स यांसारखी फीचर्स आहेत.
स्टोरेज स्पेस
यात 34 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस मिळते. याचे ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी आणि व्हीलबेस 1359 मिमी आहे. हे जाणून घ्या ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडते.

हे पण वाचा :- Maruti Baleno, Tata Altroz ला नवीन अवतारात टक्कर देणार Hyundai ची ‘ही’ लोकप्रिय कार, जबरदस्त फीचर्ससह किंमत असणार फक्त ..