7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ! कितीने वाढणार महागाई भत्ता? जाणून घ्या संपूर्ण गणित

Published on -

7th Pay Commission : लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट देण्याच्या तयारीत आहे.

कर्मचाऱ्यांचा एकीकडे महागाई भत्ता वाढवला जाईल तर दुसरीकडे, त्यांचे किमान वेतन वाढविले जाऊ शकते. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या पगार आणि महागाई भत्त्यांमध्येही वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते.

जर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 वरून 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घ्या की कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांची गणना लेबर ब्युरो करत असते. त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारे करण्यात येते.

कर्मचाऱ्यांच्या पगारात चार टक्के वाढ झाल्यास त्यांचा पगार किती असू शकतो? जाणून घेऊयात. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 18,000 रुपये असल्यास त्याचा महागाई भत्ता 38 टक्के दराने 6,840 रुपये इतका होतो. तर दुसरीकडे, जर 42 टक्के महागाई भत्ता असेल तर 7,560 रुपये इतका होतो. एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रत्येक महिन्याला 720 रुपयांनी वाढ होईल.

हे लक्षात घ्या की केंद्र सरकारकडूनमार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्के झाला होता. यानंतर सरकारने दोनदा महागाई भत्त्यामध्ये चार ते चार टक्के वाढ केली आहे. महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना असल्याची माहिती आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe