यंदाच्या खरीपात बाजरी लागवड करणार आहात काय? मग ह्या दोन जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार !

Ajay Patil
Published:

Bajara Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामातील पीक पेरणीची सुरुवात होणार आहे. काही भागात तर खरीप पिक पेरणी सुरू देखील झाली आहे. यात प्रामुख्याने कपाशी या पिकाची पूर्व हंगामी लागवड सुरू झाली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करतात.

यामध्ये सोयाबीन, मका, कापूस या पिकांचा समावेश होतो. याशिवाय तूर आणि बाजरी पिकाची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. बाजरीची लागवड ही भारत वर्षातील उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

याव्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रात देखील बाजरीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मात्र बाजरीच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजरीच्या सुधारित जातींची पेरणी करणे जरुरीचे आहे. अशा परिस्थितीत आज आपण आयसीएआर या संस्थेने विकसित केलेल्या बाजरीच्या दोन नवीन वाणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- धक्कादायक ! हरभऱ्याला हमीभावापेक्षा ‘इतका’ कमी दर मिळतोय; आगामी काळात दरवाढ होणार की नाही? वाचा….

बाजरीच्या सुधारित जाती

PB 1877 वाण :- ही जात भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या बाजरीमध्ये लोह आणि जस्ताचे प्रमाण चांगले असते. परिणामी या बाजरीचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बाजरीच्या वाणातून शेतकऱ्यांना जवळपास पाच टन पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळू शकते. निश्चितच शेतकऱ्यांनी या जातीची लागवड केली तर त्यांना चांगले उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे. 

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर लागू होणार गॅरंटी पेन्शन योजना, दोन्ही योजनेमधील फरक वाचा….

HH7 :- बाजरीची ही देखील एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. या जातीच्या बाजरीमध्ये देखील लोह आणि जस्ताचे प्रमाण विशेष खास आहे. विशेष बाब म्हणजे या वाणाची बाजरीची चव ही खूपच रुचकर असून याला बाजारात मोठी मागणी राहणार आहे.

या जातीच्या बाजरीच्या भाकरी खायला रुचकर लागतात यामुळे बाजारात याला मागणी असते. म्हणून या जातीच्या बाजरीची लागवड देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ लोकांना तब्बल 17 हजार 929 एकर जमीन मिळाली मोफत ! कोणाला मिळतोय लाभ? पहा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe