महापुरुषांची बदनामी केल्याने गुन्हे दाखल

Published on -

अहमदनगर : महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर टाकणाऱ्या दोन इंस्टाग्राम अकाऊंट धारकांसह जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या एका युवकाविरुद्ध नगरच्या भ्रिंगार कॅम्प व तोफखाना पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सतिश ज्ञानेश्‍वर मोरे (रा.सोरभनगर, भिंगार ) याने दिलेल्या फिर्यादीबरुन किंग शेख ७८६ व ईस्लाम किंग या अनोळखी इंस्टाग्राम वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकला होता. तसेच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दसरी फिर्याद प्रशांत विजय जगताप (वय २०, रा.माधवबाग, भिंगार) या युवकाने दिली आहे.

हिंदू सेमी आर आर या अनोळखी इंस्टाग्राम अकाऊंट धारकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्या अकाऊंट धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना चितळे रोडवर घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पो.कॉ. सौरभ त्रिमुखे यांनी फिर्याद दिली आहे.

उत्कर्ष गिते या व्यक्‍तीने व्हॉटसअप स्टेटस्वर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे फोटो ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या व्यक्‍तीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe