7th Pay Commission : कर्मचाऱ्यांना मिळणार दुहेरी भेट! पगारात होणार ‘इतक्या’ रुपयांची वाढ, कसे ते जाणून घ्या

7th Pay Commission

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप मोठी वाढ होणार आहे. सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

कर्मचाऱ्यांना खूप मोठा होणार असल्याने एकाच वेळी दोन भेटवस्तू मिळणार आहेत. महागाई भत्त्यामध्ये पुन्हा एकदा सुमारे 4 टक्क्यांनी वाढणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. जर असे झाले तर मूळ वेतनात भरघोस वाढ होईल. परंतु अजूनही अधिकृतपणे सरकारकडून अशी कोणतीही घोषणा केली नाही.

इतका वाढणार महागाई भत्ता

केंद्र सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए सुमारे 4 टक्के वाढवेल त्यामुळे तो 46 टक्के इतका होईल. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात विक्रमी वाढ होईल. सध्या या कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीएचा लाभ मिळत आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये प्रत्येक वर्षी दोनवेळा वाढ केली जाणार आहे, ज्याचे दर जानेवारी आणि जुलैपासून लागू करण्यात येतात. यापूर्वी मार्चमध्ये, महागाई भत्ता वाढवला होता, ज्याचे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आले होते. जर आता महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ झाली, तर त्याचे दर 1 जुलै 2023 पासून लागू केले जातील.

आली समोर धक्कादायक माहिती

केंद्र सरकार लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात 18 महिन्यांच्या अडकलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीचे पैसे टाकू शकते, अशी सध्या चर्चा आहे. जर असे झाले तर याचा एकूण 2 लाख 18 हजार रुपयांचा फायदा प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे केंद्र सरकारने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीचे पैसे खात्यात पाठवले नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe