Urabn Cruiser Hyryder : मिनी फॉर्च्युनर खरेदी करण्यासाठी तब्बल दीड वर्षाचे वेटिंग! देतेय 27 KMPL भन्नाट मायलेज

Ahmednagarlive24 office
Published:

Urabn Cruiser Hyryder : टोयोटा कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीकडून मिनी फॉर्च्युनर म्हणून ओळखली जाणारी अर्बन क्रूझर हायराइडर कार लॉन्च करण्यात आली आहे.

सध्या अर्बन क्रूझर हायराइडर कारला ग्राहकांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. टोयोटाकडून अर्बन क्रूझर हायराइडर कार 4 व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारची किंमत कमी आणि मायलेज जास्त असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे.

अर्बन क्रूझर हायराइडर या कारची एक्स शोरूम किंमत 10.73 लाखांपासून सुरू होते. तसेच टोयोटा कंपनीकडून या कारमध्ये सीएनजी व्हेरियंट देखील लॉन्च करण्यात आले आहे. तसेच मजबूत-हायब्रिड इंजिन आणि सौम्य-हायब्रिड इंजिनसह देखील ही कार ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्बन क्रूझर हायराइडर मजबूत हायब्रिड इंजिन आणि सौम्य हायब्रिडसाठी वेटिंग कालावधी

सध्या अर्बन क्रूझर हायराइडर कारला मागणी जास्त असल्याचे दिसत आहे. संपूर्ण भारतामध्ये या कारचा वेटिंग कालावधी 78 आठवड्यांपेक्षा जास्त आहे. स्ट्राँग-हायब्रिड व्हेरियंटसाठी 78 आठवड्यांपर्यंत आणि इतर व्हेरियंटसाठी 35 आठवड्यांपर्यंत वेटिंग कालावधी आहे.

अर्बन क्रूझर हायराइडर कारचे मायलेज 27 kmpl पर्यंत आहे.

टोयोटा कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या अर्बन क्रूझर हायराइडर कारला जबरदस्त मायलेज मिळत आहे. या कारमध्ये कंपनीकडून 1462cc ते 1490cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 81 bhp ते 101 bhp टॉर्क जनरेट करते. तसेच ही कार सीएनजी व्हेरियंटमध्ये 27 kmpl पर्यंत मायलेज देते.

टोयोटा आणि मारुती सुझुकी कंपनीच्या भागीदारमधील अर्बन क्रूझर हायराइडर आणि मारुती ग्रँड विटारा अशा या दोन कार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी कर्नाटकातील टोयोटा मोटरच्या बिदाडी प्लांटमध्ये दोन्ही कार तयार केल्या जात आहेत.एकत्रिपणे या दोन्ही कार विकसित केल्या आहेत.

इंटेरियर आणि वैशिष्ट्ये

टोयोटा हायराइडरला ड्युअल-टोन इंटीरियर मिळते. या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेकसह हेड-अप डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ESP, हिल-होल्ड असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल देखील देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe