Real Estate: पुण्यात फ्लॅट घ्यायचा प्लॅन आहे का? ‘या’ ठिकाणी मिळेल तुम्हाला स्वस्तात फ्लॅट, वाचा डिटेल्स

Ahmednagarlive24 office
Published:

आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुंबई, पुणे किंवा नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये घर किंवा फ्लॅट घ्यायची इच्छा असते. त्या दृष्टिकोनातून अनेक जण प्रयत्न देखील करत असतात. परंतु जेव्हा आपण मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट घेण्याचा विचार करतो.

त्यावेळी सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या डोक्यात विचार येतो तो त्या ठिकाणी असलेल्या फ्लॅटच्या किमतींचा आणि आपला बजेट. कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

याबाबतीत जर आपण पुण्याचा विचार केला तर या ठिकाणी फ्लॅट घ्यायला अनेक जणांची पसंती असते. कारण पुणे एक विद्येचे माहेरघर तर आहेच परंतु एक सांस्कृतिक शहर म्हणून देखील पुण्याची ओळख आहे. परंतु झपाट्याने पुण्याचा विकास झाल्यामुळे या ठिकाणी जागा किंवा फ्लॅट यांच्या किमती सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्या बाहेर गेलेले आहेत.

परंतु तरी देखील बरेच व्यक्ती बजेटमध्ये कुठे फ्लॅट किंवा घर मिळेल का याचा शोध घेत असतात. याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये पुण्यातील काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत ज्या ठिकाणी बजेटमध्ये स्वस्तात फ्लॅट मिळू शकतो.

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील घर घेण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण ठिकाणे

1- खराडी,मांजरी- हा भाग झपाट्याने विकसित होत असून या ठिकाणी अजून देखील बऱ्याच प्रमाणात रिकाम्या जमिनी शिल्लक आहेत. एवढेच नाही तर या ठिकाणहून जवळच इओन आयटी पार्क असल्यामुळे या ठिकाणी गुंतवणुकीचे दर चढेच राहण्याचा देखील एक अंदाज आहे. जर तुमचा आर्थिक बजेट कमी असेल आणि कमीत कमी गुंतवणुकीतून अधिकचा नफा मिळवायची इच्छा असेल तर तुम्ही खराडी आणि मांजरी या ठिकाणी फ्लॅट खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. या ठिकाणच्या फ्लॅटच्या किमती पाहिल्या तर त्या वन बीएचके साठी 38 ते 45 लाख आणि टू बीएचके करिता 56 लाख ते एक करोड रुपये अशा आहेत.

2- कोंढवा बुद्रुक- या ठिकाणाहून पुण्यातील कात्रज आणि हडपसर व पुणे कॅम्प या ठिकाणी जाणे खूप सोयीस्कर आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुणे शहराचा विस्तार आणखी होण्याची शक्यता असल्यामुळे कोंडवा या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करणे भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरू शकते. या ठिकाणी फ्लॅटच्या किमती कमी आहेत कारण हा भाग पुण्याच्या थोडा बाहेर आहे. या ठिकाणी जर तुम्हाला वन बीएचके चा फ्लॅट घ्यायचा असेल तर तो 32 ते 37 लाखांपर्यंत मिळणे शक्य आहे व टू बीएचके चा फ्लॅट 43 ते 55 लाखांपर्यंत मिळू शकतो.

3- वाघोली- पुणे अहमदनगर रोडवर असलेला हा परिसर देखील भविष्यात चांगल्या प्रकारे विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी फ्लॅटमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यासाठी फायद्याची ठरू शकते. या ठिकाणी देखील कमीत कमी किमतीत फ्लॅट मिळणे शक्य आहे. तसेच या ठिकाणी फ्लॅट घेण्याचा प्लस पॉईंट म्हणजे या ठिकाण होऊन ईऑन आयटी पार्क आणि पुणे विमानतळ जवळ आहे. या ठिकाणी वन बीएचके चा फ्लॅट 27 लाखात तर टू बीएचके चा फ्लॅट 38 ते 41 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतो.

4- येवलेवाडी- पुणे शहरापासून थोडा लांब असलेला हा भाग असून थोडा आऊट साईडला आणि शांत परिसरामध्ये आहे. या ठिकाणी अनेक प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात या ठिकाणी सुद्धा फ्लॅटच्या किमती वाढण्याच्या शक्यता आहे. आताच्या किमती पाहिल्या तर वन बीएचके 25 ते 29 लाख आणि टू बीएचके 29 ते 43 लाख रुपयांमध्ये मिळणे शक्य आहे.

5- म्हाळुंगे- हा परिसर पुणे ते मुंबई हायवे च्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी कायमच जागांना मागणी राहण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यातील प्रसिद्ध असलेला हिंजवडी आयटी पार्क या ठिकाण जवळ असल्याने या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करणे भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी वन बीएचके फ्लॅटची किंमत 32 ते 49 लाख तर टू बीएचके 46 ते 98 लाख रुपयात मिळत आहेत.

6- फुरसुंगी- या ठिकाणी अनेक हाउसिंग प्रोजेक्ट उभारले जात असून पुणे ते सासवड रस्त्याला लागून हा भाग आहे. या ठिकाणाहून हडपसर जवळ असून या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत. फुरसुंगी गेल्या दहा वर्षात वेगाने विकसित झाले असून या ठिकाणी जर तुम्हाला फ्लॅट घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीत चांगले फ्लॅट मिळणे शक्य आहे. या ठिकाणी सध्या वन बीएचके ची किंमत 27 ते टू बीएचके ची किंमत 39 लाख रुपये आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe