5 New Hindu Temples in India : भारत हा एक असा देश आहे जिथे सर्वाधिक प्राचीन मंदिरे आढळून येतात. तसेच ही प्राचीन मंदिरे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगभरातील अनेक पर्यटक ही प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी भारतात येत असतात.
तसेच भारतातील नागरिकही या प्राचीन मंदिरांचे जतन करत आहेत. आता येत्या काळात देखील भारताला ५ भव्य हिंदू मंदिरे मिळणार आहेत. यामधील तुम्ही फक्त अयोध्येमध्ये तयार होणाऱ्या राम मंदिराबद्दल ऐकले असेल. मात्र येत्या काळात राम मंदिराशिवाय आणखी ४ मंदिरे भारतामध्ये तयार होत आहेत.
अयोध्या राम मंदिर
हिंदू धर्मग्रंथांनुसार अयोध्या हे भगवान श्रीरामाचे जन्मस्थान आहे. श्री राम हा श्री हरी विष्णूचा अवतार मानला जातो. हिंदू धर्मामध्ये रामाला खूप महत्व आहे. हिंदूंचा राजा म्हणून श्री रामाला आजही ओळखले जाते. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येमध्ये श्री रामाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
यानंतर बांधकामाला सुरुवात होऊन हे काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले. डिसेंबर 2023 मध्ये राममंदिराचे काम पूर्ण होणार असून जानेवारी २०२४ मध्ये नागरिकांना रामाचे दरुशन घेता येणार आहे.
वृंदावन चंद्रोदय मंदिर
वृंदावन, मथुरा येथे जगातील सर्वात लांब वृंदावन चंद्रोदय मंदिर बांधण्यात येत आहे. या मंदिराची एकूण किंमत 300 कोटींपर्यंत आहे. इस्कॉन बेंगलोरकडून बांधण्यात आलेले हे सर्वात महागडे मंदिर आहे.
येत्या काही काळात हे मंदिर हिंदूंसाठी मोठे पर्यटन स्थळ ठरणार आहे. वर्षभरात येणारे विविध प्रकारचे धार्मिक सण, उत्सव या मंदिरात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे जगभरात वृंदावनची ओळख निर्माण होणार आहे.
ओम आश्रम मंदिर
ओम आश्रम मंदिराचे बांधकाम गेल्या २५ वर्षांपासून सुरु आहे. 250 एकरांवर या मंदिराचे काम सुरु आहे. या ठिकाणचे शिवमंदिर ४ भागात विभागले आहे तसेच ते भूमिगत तयार करण्यात आले आहे.
त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश, ज्यांना या विश्वाचे निर्माते म्हटले जाते, ते ‘ओम’ (ओम) चे प्रतीक मानले जातात. पृथ्वीवर प्रथमच राजस्थानमध्ये ओमचे निराकार रूप प्रकट झाले आहे. या मंदिराचे काम जवळपास होत आलेले आहे. त्यामुळे लवकरच हिंदूंना आणखी एक नवीन मंदिर मिळणार आहे.
महाकाल लोक मंदिर
भारतात भगवान शिवाला सर्वजण मानतात. तसेच हिंदूं नागरिकांमध्ये शिवाला अधिक महत्व आहे. रुद्रसागराच्या काठावर श्री महाकाल लोक पुराणिक मंदिर तयार होत आहे. या मंदिरामध्ये भगवान शिव, देवी सती आणि इतर धार्मिक कथांशी संबंधित सुमारे 200 शिल्पे आणि भित्तिचित्रे येथे तयार करण्यात आली आहेत.
लवकरच हे मंदिर हिंदू भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यामुळे आणखी एक भव्य दिव्य मंदिर हिंदू लोकांना मिळणार आहे. या मंदिराच्या 108 खांबांमध्ये शिवाचे आनंद तांडव चिन्हांकित करण्यात आले आहेत.
रामायण मंदिर बिहार
बिहारच्या पूर्व चंपारणमधील चकिया-केसरिया नगरमध्ये रामायण मंदिर बांधले जाणार आहे. रामाचे हे जगातील सर्वात उंच मंदिर असणार आहे. या मंदिर-समूहात 18 देवतांची मंदिरे असतील, ज्यामध्ये राम हे प्रमुख देवता असतील. ज्या ठिकाणी मंदिर तयार होणार आहे त्याच ठिकाणी रामाची मिरवणूक थांबल्याचे बोलले जाते.