DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मार्च महिन्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये केंद्र सरकारकडून ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे.
देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली जाऊ शकते. DA वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्त्यात देखील सुधारणा केली जाऊ शकते.
लवकरच कर्मचाऱ्यांच्या पुढील महागाई भत्त्यामध्ये देखील लवकरच वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ५० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यामध्ये केली जाऊ शकते.
तसेच २०२४ या नवीन वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांना एचआरए वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र कर्मचाऱ्यांना वर्षातील दुसरी DA वाढ लवकरच मिळू शकते.
DA नंतर HRA वाढण्याची अपेक्षा आहे
या वर्षातील कर्मचाऱ्यांची पहिली DA वाढ मार्च महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे. ही DA वाढ ४ टक्क्यांनी करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे.
तसेच आता पुढील DA वाढ देखील ४ टक्क्यांनी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवला तर कर्मचाऱ्यांचा DA ५० टक्के होईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा HRA देखील वाढण्याची शक्यता आहे.
3 टक्के एचआरए वाढण्याची चिन्हे
जर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्के झाला तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील ३ टक्क्यांनी वाढू शकतो. यापूर्वी जुलै 2021 मध्ये, महागाई भत्त्याच्या 25% क्रॉससह HRA वाढविण्यात आला होता आणि त्या वेळी DA देखील 28% पर्यंत वाढविण्यात आला होता.
पगार किती वाढणार?
HRA – X-Y-Z मध्ये 3 श्रेणी आहेत. 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे ‘X’ वर्गात मोडतात. 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे ‘Y’ श्रेणीत येतात. 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे ‘Z’ वर्गात मोडतात.
उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 56,900 रुपये असेल तर नंतर त्याचा एचआरए 27% वर अंदाजे 15,000 रुपये पगार वाढेल, परंतु 30% वर, तो 17,000 महिना असेल तर त्याचा पगार वार्षिक 20,000 रुपये होईल असा अंदाज आहे.