Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मान्सूनची वाट पाहत आहे मात्र मान्सून राखडलेलाच दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे.
यंदा केरळमध्येच उशिरा दाखल झालेला मान्सून अद्यापही महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. आतापर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचायला हवा होता मात्र अद्यापही मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही.

मात्र आता महाराष्ट्र वासियांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच मान्सूनची महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मान्सूनचा प्रवास लांबल्याने शेतकऱ्यांची कामे देखील ठप्प झाली आहेत. शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सध्या हवामान विभागाकडून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 आणि 25 जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून सर्वत्र सक्रिय होईल
सध्या मान्सूनसाठी वातावरण पोषक आहे. आणि येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेती कामे करावीत असा हवामान विभागाकडून सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईच्या उंबरठ्यावर मान्सून
यंदा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी बराच उशीर झाला आहे. मात्र आता मान्सून महाराष्ट्रातील मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मान्सून २४ जूनला मुंबईत दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनच्या प्रवेशाचे ठिकाण बदलेल
यंदाच्या मान्सून उशिरा दाखल होणार असला तरी मान्सूनच्या प्रवेशाचे ठिकाण बदलले असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही काळ मंदावला. दुसरीकडे, पूर्वेकडील वाऱ्यांचा वेग नियमित राहिला. त्यामुळे यंदा मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.