Driving license : तुम्हालाही आता नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर सतत आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ऑनलाइन वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.
तर आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.
देशामध्ये कोणतेही वाहन चालवण्यासाठी सर्वात प्रथम त्या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. मग ते दुचाकी असो किंवा ट्रक. ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे आता खूप सोपे झाले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार
हलके मोटार वाहन लायसन्स
लर्निंग लायसन्स
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स
जड मोटार वाहन लायसन्स
कायमस्वरूपी लायसन्स
ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी कागदपत्रे
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल)
जन्मतारीख प्रमाणपत्र (तुम्ही 10 वी गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र, तुमच्या जन्मतारखेसाठी ओळखपत्र देऊ शकता)
पासपोर्ट आकाराचा फोटो
स्वाक्षरी
शिकण्याचा परवाना क्रमांक
मोबाईल नंबर
ड्रायव्हिंग लायसन्स कोण वापरू शकते?
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ विभागाकडून वय मर्यादा ठेवण्यात आली आहे. १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारे नागरिकच ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकतात. १८ वर्षाखालील मुलांनी वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. जर असे केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा
जर तुम्हाला घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही त्याठिकाणी ऑनलाईन लायसन्ससाठी अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला लर्निग लायसन्स बनवावे लागेल.
लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स कसे बनवायचे
सर्वप्रथम सर्व उमेदवार रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक होम पेज उघडेल. येथे तुम्हाला पेजमध्ये तुमचे राज्य निवडावे लागेल.
यानंतर तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल. येथे तुम्हाला अप्लाय फॉर लर्नर लायसन्सवर क्लिक करावे लागेल.
परवाना तयार करण्यासाठी तुम्हाला काही सूचनांचे पालन करावे लागेल. यासाठी एक नवीन पेज उघडेल, तुम्हाला (सुरू ठेवा) वर क्लिक करावे लागेल.
अर्जाचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला अर्जामध्ये तुमच्या पसंतीनुसार श्रेणी निवडावी लागेल आणि फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती एंटर करावी लागेल.
यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
आता LL Test Slot Online वर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमची परीक्षा द्यावी लागेल. तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला लर्निंग लायसन्स दिले जाईल.