दाखल्यासारख्या विविध सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र’ उभारण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना ही केंद्रे चालण्यासाठी दिली जात आहेत. पुणे जिल्ह्यात दीड हजारपेक्षा अधिक ‘आपले सेवा केंद्र’ आहेत. या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळत आहे.
आपले सरकार केंद्रासाठी कोठे कराल अर्ज ?
आपले सरकार केंद्रासाठी प्रशासनाकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तसेच ऑनलाईन पद्धतीने सरकारच्या पोर्टलवर या संबंधित माहिती असते. त्यानुसार संबंधित या केंद्रासाठी अर्ज करू शकतात.
४०० जण एकाच वर्षात पात्र
■२०२२-२०२३ या वर्षात आपले सरकार केंद्रासाठी अर्ज करणायांपैकी फेब्रुवारी अखेर पर्यंत तब्बल ४०० उमेदवार पात्र ठरले आहेत.
■ ही नवी ४०० केंद्रे सुरु होणार आहेत. त्यातील २०० पेक्षा अधिक केंद्रे सुरु झाली असून बाकीची २०० केंद्र देखील लवकरच सुरु होणार आहेत. दरम्यान, या केंद्राच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात आधीच १, ४३३ केंद्रे आहेत.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
केंद्रासाठी समिती पात्रता ठरवते. त्यानुसार पात्र उमेदवारांना आपले केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली जाते. तसेच आवश्यक कागदपत्रे मागवली जातात.
त्यामध्ये सर्वसाधरणपणे आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, संगणक साक्षर असल्याचे प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र जागा भाड्याने असेल तर त्या करारा संदर्भातील कागदपत्र आदींची आवश्यकता असते