India News : देशभरात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या किरकोळ विक्रीसाठी सुसज्ज असे पेट्रोल पंप उपलब्ध असतील, अस विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन मर्चंट चेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सांगितले.
या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी पहिले इथेनॉलमिश्रित पेट्रोल पंप कार्यान्वित झाले, त्यानंतर त्याची संख्या आता ६०० च्या पुढे गेली आहे. २०२५ पर्यंत देशात सगळीकडे हे पेट्रोल पंप असतील, असे पुरी यांनी सांगितले.

पेटोलमधील इथेनॉलच्या मिश्रणाचे २०१३-१४ मध्ये १.५३ टक्के प्रमाण होते, ते मार्च २०२३ पर्यंत सुमारे ११.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. परिमाणस्वरूपात इथेनॉलमिश्रित पेट्रोल २०१३-१४ मधील ३८ कोटी लिटरवरून २०२१-२२ ते ४३३.६ कोटी मध्ये ते ४३३.६ लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
त्याचप्रमाणे, जैव-इंधन विकणाऱ्या पेट्रोल पंपांची संख्या २०१६-१७ मधील २९,८९० वरून जवळपास तिप्पट वाढून ६७,६४० झाल्याची माहिती पुरी यांनी दिली. पुरी पुढे म्हणाले, २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलमिश्रित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
सरकारने निर्धारित वेळेपूर्वी ११.५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य सरकारने २०३० वरून आता २०२५ केले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या १० टक्के मिश्रणाचे लक्ष्यही जून २०२२ मध्ये वेळेआधीच गाठले गेले आहे, असे त्यांनी सांगितले.