काश्मीरमध्ये दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध

Published on -

India News : जम्मू-काश्मीरच्या शेतीत सध्या जिथे-तिथे लॅव्हेंडरचा सुगंध दरवळताना दिसून येत आहे. उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखले जाणारे लॅव्हेंडर हे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते पीक ठरले आहे.

श्रीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भागात लॅव्हेंडरची लागवड केली असल्याचे दिसून येते. श्रीनगर हा काश्मीरमधील सर्वात सुपीक प्रदेश मानला जातो. लॅव्हेंडरच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि चांगल्या नफ्याच्या क्षमतेमुळे या शेतीने शेतकऱ्यांना आकर्षित केले आहे.

लॅव्हेंडरच्या लागवडीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधीही खुल्या झाल्या आहेत. यासंदर्भात श्रीनगर येथील कृषी उद्योजिका मदिहा तलत म्हणाल्या की, ‘आम्ही आधी तेल काढतो आणि नंतर त्यावर प्रक्रिया करतो. लॅव्हेंडरच्या लागवडीत प्रचंड क्षमता आहे.

आम्ही कच्च्या तेलाची निर्यात करतो. आपल्या पारंपरिक पिकांच्या तुलनेत त्याची निर्यात बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत हे पीक अधिक फायदेशीर आहे. हे जास्त काळ ठेवता येते आणि त्याचे फायदेही जास्त असतात.

याशिवाय लॅव्हेंडरच्या पानांचा चहा म्हणूनही वापर केला जाऊ शकतो आणि ते तेल तयार करण्यासाठी आणि औषध आणि मसाजमध्ये देखील वापरता येते. तलतने तिचा स्वतःचा ‘रूहपोश’ नावाचा ब्रँड सुरू केला आहे. लॅव्हेंडर चहा परदेशात खूप लोकप्रिय आहे.

अनेक देशांमध्ये शरीराच्या मसाजसाठीही याचे तेल वापरले जाते. लॅव्हेंडरच्या लागवडीमुळे स्थानिक तरुण आणि महिलांना रोजगारही मिळतो. गेल्या तीन वर्षांपासून लॅव्हेंडरची लागवड करत असलेले पुलवामा येथील रहिवासी सीरत जान म्हणाले, आम्ही दररोज किमान एक क्विंटल कच्चा माल गोळा करून सुमारे ३७० रुपये कमावतो. साधारणपणे ३०-३५ महिला आणि काही पुरुषही येथे काम करतात. यावर आमचा उदरनिर्वाह चालतो, असे सीरत जान यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News