Maharashtra News : तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी जोरदार चालू असून शेतकऱ्याची बी-बियाणे, खते, औषधे यांच्या खरेदीत फसवणूक होत असून ती होऊ नये, यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका सरचिटणीस मच्छिद्र मंडलिक व जिल्हा सहसचिव रमेश राक्षे यांनी केली आहे.
पंचायत समितीच्या कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांना दिलेल्या निवेदनात मंडलिक व राक्षे यांनी म्हटले, की अकोले तालुक्यातील शेतकरी खते खरेदी करताना त्यांना काही खतामध्ये शेतकऱ्यांना नको असलेले खते व औषधे लिंकिंगमध्ये घेण्यास काही दुकानदार भाग पाडतात.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Ahmednagar-News-5-1.jpg)
त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक फटका बसत आहे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून खरीप हंगामाच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने तालुक्यातील सेवा केंद्रांची तपासणी मोहिम राबविण्यात यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री, खताचे लिंकिंग, बोगस खते व बी बियाणे, साठा पुस्तके, खरे, विकी परवाने आदी कागदपत्रांची तपासणी करावी, प्रत्येक तालुका स्तरावर एक तक्रार निवारण कक्ष असावा,
या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन अकोले तालुक्यामध्ये झालेले दिसत नाही. अकोल्यातील शेतकरी भाऊसाहेब सोन्याबापू बाळसराफ यांनी तणनाशक ८९० रुपयाँ खरेदी केले, तेच औषध दुसऱ्या दुकानात ९५० रुपयांना मिळते. ६० रुपये जास्त गेल्याचे लक्षात • आल्यावर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली.
मात्र या तक्रारीची अजून दखल घेतलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रूद्रे, प्रा. रामनाथ काकड, प्रमोद मंडलिक, दत्ता ताजने, भाऊसाहेब वाकचौरे, दिलिप मंडलिक, भाऊसाहेब शिंगोटे, नरेंद्र देशमुख, सखाहरी पांडे, सुरेश गायकवाड, रजनीकांत भांगरे, हरिभाऊ गोर्डे, सुदाम मंडलिक आदींच्या सह्या आहेत…
किंमतींवर नियंत्रण हवे
औषध विक्रेत्या कंपन्या उत्पादनावर अव्वाच्या सव्वा किंमती टाकतात. कुठल्याही औषध दुकानाकडून औषधे खरेदी केल्यावर त्याची किंमत तोच ठरवत आहे. कंपनीचे यावर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. महाराष्ट्र शासन व संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांनी या उत्पादनावर नियंत्रण ठेवावे; सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक थांबावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.