India News : योगी सरकार लवकरच अयोध्यावासीयांना आणखी एक भेट देणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होण्याच्या आधी वाराणसीप्रमाणे शरयूमध्येही क्रुझ आणि हाऊस बोटची सुविधा सुरू होणार आहे.
पहिली क्रुझ ऑक्टोबरपर्यंत शरयूमध्ये उतरेल तर जानेवारीपर्यंत दोन क्रुझ आणि हाऊसबोट शरयूमध्ये उतरतील. पवित्र शरयू नदीतील क्रुझचा (कनक आणि पुष्पक) आनंद घेण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. हाऊसबोट आणि क्रुझचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल.

दीपोत्सवानिमित्त शरयू नदीच्या जलप्रवाहात क्रुझ आणि हाऊसबोटीतून जलभ्रमण करण्याची संधी मिळणार आहे. रामनगरीच्या शरयू नदीत कनक आणि पुष्पक (हाऊसबोट आणि क्रुझचे नाव) पर्यटकांना आकर्षित करतील. अयोध्या क्रुझ लाइन्सशिवाय अलकनंदा क्रुझ लाइन्स देखील शरयूमध्ये क्रुझ चालवण्याची तयारी करत आहे.
ही कंपनी सध्या वाराणसीमध्ये क्रुझ चालवत आहे. अयोध्येत अलकनंदाच्या क्रुझचे बांधकाम सुरू झाले आहे. कंपनीचे संचालक विकास मालवीय यांनी सांगितले की, शरयूमध्ये चालणारी क्रुझ वाराणसीमधील क्रुझपेक्षा वेगळी असेल. या डबल डेकर क्रुझमध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
ऑक्टोबरपर्यंत ती तयार होईल. गुप्तार घाटाच्या आच्छादित शेडमध्ये आलिशान क्रुझ बांधण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या क्रुझची लांबी २५ मीटर आणि रुंदी ८.३ मीटर असेल. शरयूमधील प्रदूषण टाळण्यासाठी क्रुझ सौरऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. क्रुझमध्ये पहिल्या मजल्यावर १०० पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. वरचाबसण्याची व्यवस्था असेल. वरचा जिथे भाविक उभे राहून शरयू विहाराचा आनंद घेऊ शकतील.