Monsoon Update :- यावर्षी अगदी जून महिन्यापासून पावसाची सुरुवात पाहिली तर ती अगदी संथ गतीने झाली असून राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन खूप उशिरा झाले. तसेच मान्सूनचे जेव्हा तळ कोकणामध्ये आगमन झाले व त्याच वेळेस अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे बरेच दिवस कोकणातच मान्सून रखडला.
परंतु चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले व मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला व पेरण्या देखील केल्या जात आहे. परंतु यामध्ये आता शेतकऱ्यांची चिंता वाढेल अशी एक बातमी समोर येत आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी
यावर्षी आधीच उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली व आता कुठे खरिपाच्या करण्याने वेग घेतला आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांची चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे व ती म्हणजे आतापर्यंत राज्यामध्ये 27% कमी पावसाचे नोंद झाली असून विदर्भ तसेच मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात देखील सरासरी पेक्षा पावसाची कमी नोंद झालेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पावसावर एल निनोचे सावट आहे. प्रशांत महासागरामध्ये एल निनो ची स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
जर याबाबतीत हवामान खात्याचा दीर्घकालीन अंदाज पाहिला तर त्यानुसार सरासरी इतक्याच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आधीच यावर्षी पेरण्या उशिरा झालेल्या आहेत. यामध्ये आता हवामान खात्याने हा अंदाज वर्तवल्यामुळे जर पावसात खंड पडला तर शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.