Dragon Fruit Farming: उच्चशिक्षित तरुणाने जैविक खतांच्या जीवावर बहरवली ड्रॅगनफ्रुटची शेती, 25 वर्षे मिळेल शाश्वत उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dragon Fruit Farming:-सध्या शेती विषयी व्यावसायिक दृष्टिकोन वृद्धिंगत होत असून मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात येत आहे. शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक पिकांची लागवड करण्यात येत असून त्या माध्यमातून चांगले उत्पादन देखील शेतकरी मिळवत आहेत. दुसरे महत्त्वाचे बाब म्हणजे आता शेतीमध्ये अनेक उच्च शिक्षित तरुण आल्यामुळे असे तरुण पारंपारिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या प्रकाराची आधुनिक पिके आणि बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्व असलेले अनेक औषधी वनस्पतींची देखील लागवड करत आहेत.

यामध्ये तरुण उच्चशिक्षित आता तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन मिळवण्यात देखील यशस्वी ठरत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील उच्चशिक्षित असलेले ओंकार मच्छिंद्र चौधरी या तरुणाचा विचार केला तर या तरुणाने देखील ड्रॅगन फ्रुट ची लागवड यशस्वी केली आहे. या लेखांमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड ते व्यवस्थापन कशा पद्धतीने केले याबद्दल माहिती घेऊ.

 उच्चशिक्षित तरुणाने केली ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील ओंकार मच्छिंद्र चौधरी  यांनी बी आय टी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये शिक्षण घेतले असून नोकरी न करता त्यांनी शेतीची कास धरली व ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ड्रॅगन फ्रुटचे खत व्यवस्थापन करताना त्यांनी रासायनिक खतांना तिलांजली देऊन जैविक खतांचा पूर्ण वापर केला व या जैविक खतांच्या जोरावर ड्रॅगन फ्रुटची शेती यशस्वी केली आहे.

या माध्यमातून त्यांना सहा टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर पहिला तोडा त्यांनी काढला असून या पहिल्याच तोड्यामध्ये त्यांना 200 किलोचे उत्पादन मिळाला आहे.  विशेष म्हणजे या 200 किलो ड्रॅगन फ्रुटची खरेदी व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन 150 रुपये प्रति किलो या दराने केली. जेव्हा कोरोना कालावधी होता तेव्हा ओंकार यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीचा सविस्तर अभ्यास केला व बाजारपेठेचा देखील अंदाज घेतला. म्हणून त्यांनी हा नवीन प्रयोग करण्याचे ठरवले.

 लागवड करताना अशा पद्धतीने केले व्यवस्थापन

ओंकार चौधरी यांनी 35 गुंठे क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय घेतला. याकरिता सहा बाय दहा फूट अंतरावर बेड तयार केले व या बेडवर  शेणखत चांगले मिसळून घेतले व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मल्चिंग पेपर अंथरला. त्यानंतर ड्रॅगन फ्रुटला आधार देण्यासाठी सहा फुटांवर सिमेंटचे पोल उभे केले व पोलवर सिमेंटची गोल रिंग बसवली. त्यानंतर लागवड करण्याकरिता सोलापूर होऊन संजीवनी ड्रॅगन फ्रुट या जातीची 2400 रुपये आणली व त्यांची लागवड केली.

व्यवस्थापनाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या फळाला उष्ण हवामानाची गरज असते. त्यामुळे ओंकार यांनी संपूर्ण बागेमध्ये झाडांवर चारशे बल्ब रात्रीच्या वेळी लावले व त्या माध्यमातून उष्णता देण्याचा प्रयत्न केला. ड्रॅगन फ्रुट हे हे पीक जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यात अधिक बहरते. कमी पाण्यात आणि दुष्काळी भागात देखील हे पीक चांगले येते. अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचा असेल तर ड्रॅगन फ्रुट हा एक चांगला पर्याय आहे.