MP Sujay Vikhe : भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडणे ही आपली भूमिका आहे. भगवद्गीतेच्या सिद्धांतानुसार फळाची अपेक्षा न करता काम करीत राहणे हे विखे परिवाराचे तत्त्व आहे.
असा निर्वाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास आणि राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून राष्ट्रवादीचे अजित पवार आणि इतर सहकारी भाजपा- शिवसेना युतीबरोबर आले असल्याचा दावा खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राजकीय परिस्थितीवर विश्लेषण करू शकत नाही.
विखे पाटील म्हणाले,मोदींच्या नेतृत्वावर जनसामान्यांचा विश्वास तर आहेच पण विरोधी पक्षात असलेले अनेक गट मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपासोबत येत आहेत. राष्ट्रवादीमधील अनेक सहकारी याच दृष्टीने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विश्लेषण करू शकत नाही. मात्र, या नव्या समीकरणामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती मिळेल.
फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करणे, हे आपले काम
आगामी काळात अहमदनगर लोकसभेची उमेदवारी भाजपाचे वरिष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र ‘फडणवीस आघाडीतील पक्षांशी विचार विनिमय करून निश्चित करतील. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करणे, हे आपले काम आहे.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ.कोल्हे यांच्या या टीके विषयी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ते जे बोलतायेत त्यांचे वेगवेगळे नाट्यप्रयोग मागील काही काळापासून सुरू आहेत. ते उत्तम अभिनेते आहेत. त्यांची संवादशेली चांगली आहे. मात्र, ते अद्याप जमिनीवर आले नाहीत.
मागील तीन वर्षांत राज्यात नेमकं काय झालं ? ते त्यांना कळू दे.
जमिनीवरची वास्तविकता त्यांना माहित नाही. उत्तम अभिनेता म्हणून आम्ही लवकरच त्यांचा गौरव करू, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले, ठाकरे अखेर घराबाहेर पडले आहेत.
मागील तीन वर्षांत राज्यात नेमकं काय झालं ? ते त्यांना कळू दे. दौर्यांना होणारी गर्दी आणि प्रत्यक्ष होणारे मतदान सारखे नसते. काम करणाऱ्या, लोकांचे प्रश्न ‘सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोकांचे मतदानाचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.