Ahmednagar News : जनआक्रोश मोर्चातील १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Published on -

Ahmednagar News : विविध मागण्यासाठी मागासवर्गीय संघटनांच्या वतीने येथील प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने १२५ जाणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, म्हणुन निघृण हत्या करण्यात आली. मुंबई येथे इंजिनिअरींगची शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिची वसतीगृहात घुसून अत्याचार करून हत्या करण्यात आली.

तसेच अनेक जिल्हयामध्ये मागासवर्गीय समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होत आहे. या घटनांच्या निषेधार्थ संगमनेर शहरामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याने पोलिसांनी काल सोमवारी १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान जनआक्रोश मोर्चातील कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख अमर कतारी व तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकशाहीत विविध मागण्यांसाठी आंदोलन, मोर्चे याद्वारे कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मांडण्याची मुभा असते, त्या अनुषंगाने विविध संघटना मोर्चे किंवा आंदोलन करत असतात.

संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व दलित संघटनांच्या वतीने (दि.८) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अशाच प्रकारे संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या भगवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या मोचति सहभागी झालेल्या काही हिंदू बांधवावर देखील काही दिवसानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्हे सूडबुद्धीने राजकीय हेतु पुरस्सर होते. संगमनेरात शिंदे गटाच्या लोकांनी खासदार संजय राऊत यांच्या फोटोला काळे फासले व कोणतीही पूर्व परवानगी न घेता आंदोलन केले.

त्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आक्षेप घेत, सदर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची लेखी मागणी करून देखील सदर आंदोलकांवर अजूनही गुन्हे दाखल झालेले नाही. चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावे आणि पोलीस खात्याने सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली नसल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन अमर कतारी यांनी केले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News